अक्षय शिंदे, माधुरी लहासेने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:35 AM2017-10-25T00:35:56+5:302017-10-25T00:36:10+5:30
आर.डी.भक्त कॉलेज आॅफ बी. फार्मसी विद्यालयात आयोजित दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचा मंगळवारी रात्री समारोप झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील आर.डी.भक्त कॉलेज आॅफ बी. फार्मसी विद्यालयात आयोजित दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचा मंगळवारी रात्री समारोप झाला. या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या १२५ किलो वजनी गटात बलभीम कॉलेजच्या अक्षय शिंदे याने तर महिलांच्या ७२ किलो वजनी गटात देवगिरी महाविद्यालय औरंगाबादच्या माधुरी लहासे हिने बाजी मारली.
समारोपास माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष किशनलाल भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुपारकर, नगरपालिकेचे गटनेते विष्णू पाचफुले, नगरसेवक रावसाहेब राऊत, संतोष जांगडे, निखिल पगारे, राजू देशमाने, अमरचंदजी भक्त आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाºया ६८ महाविद्यालयांतील ३०० महिला व पुरूष मल्ल सहभागी झाले होते. यामध्ये राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्लांचा समावेश होता. विजेत्या खेळाडूंना माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेनेचे गटनेता विष्णूभाऊ पाचफुले, बाजार समितीचे संचालक गोपाल काबलिये, प्रा. डॉ. आत्मानंद भक्त यांच्या हस्ते खेळाचे पोषाख, टी. शर्ट, बक्षीस व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.