अक्षय्य तृतीयेला होणार ८० टन आमरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:04 AM2021-05-14T04:04:16+5:302021-05-14T04:04:16+5:30
अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याचे मोठे नुकसान झाले. तरी यंदा अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीला येत आहे. अक्षय्य तृतीयेच्या ...
अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याचे मोठे नुकसान झाले. तरी यंदा अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीला येत आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंबा दान करून मग आमरस खाण्यास सुरुवात केली जाते. अक्षय्य तृतीया ते वटपौर्णिमापर्यंत आंबे खाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र, आंब्याच्या पहिल्या पेटीच्या आगमनापासून त्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्याही आता वाढली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आवर्जून प्रत्येक घरात आमरसाचा बेत होतोच. यामुळे जाधववाडी येथील आडत बाजारात ८० टन आंबा विक्रीला आला आहे. त्यातील बहुतांश आंबा विक्री झाल्याचे आडत व्यापाऱ्यांनी नमूद केले. बाजारात ७० ते २०० रुपये किलोपर्यंत आंबा विकला जात आहे. आज आंबा खरेदीसाठी बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती. आता मराठवाड्यातील केशर आंबाही विक्रीला आला आहे. त्यास १५० ते २०० रुपये किलोपर्यंत भाव मिळत असल्याचे केशर आंबा उत्पादकांनी सांगितले.