औरंगाबाद शहरात ‘भानदास एकनाथ’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:05 AM2018-03-08T00:05:22+5:302018-03-08T00:05:33+5:30

‘भानदास एकनाथ’, ‘एकनाथ महाराज की जय’ असा गजर करीत बुधवारी सकाळी एकनाथ महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी थांबलेल्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

Alarms of 'Bhanadas Eknath' in Aurangabad city | औरंगाबाद शहरात ‘भानदास एकनाथ’चा गजर

औरंगाबाद शहरात ‘भानदास एकनाथ’चा गजर

googlenewsNext
ठळक मुद्देनाथषष्ठीनिमित्त जागोजागी भाविकांनी पालखीचे मनोभावे घेतले दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘भानदास एकनाथ’, ‘एकनाथ महाराज की जय’ असा गजर करीत बुधवारी सकाळी एकनाथ महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी थांबलेल्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. शहरातील वातावरण भक्तिमय झाले
होते.
नाथषष्ठीनिमित्त औरंगपुºयातील नाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविक जमा होऊ लागले होते. काकड आरती व भजन झाल्यानंतर सजविलेल्या पालखीत नाथ महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या. ‘एकनाथ महाराज की जय’ असा जयघोष करीत सकाळी ७ वा. मंदिरातून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. रथात हभप अ‍ॅड. गंगाधर घुगे महाराज विराजमान झाले होते. हभप कृष्णा आरगडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली विविध भजनी मंडळे भजन म्हणत पुढे सरकत होते. महिला भाविकांनी फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा केला. भजन म्हणत असताना ‘भानदास एकनाथ’चा गजर केला जात होता. पालखी मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. जागोजागी पालखीला थांबवून भाविक दर्शन घेत होते. आदर्श महिला भजनी मंडळ, सरस्वती महिला मंडळ, शिवपार्वती महिला मंडळ, शारदा महिला मंडळ, दुर्गामाता महिला मंडळ, साई महिला मंडळ, गुरुकृपा महिला मंडळ, माऊली महिला मंडळ, हरिओम महिला भजनी मंडळातील महिला सहभागी झाल्या होत्या. कुंभारवाडा येथे मुरलीधर बोंबले यांनी भाविकांना शीतपेयाचे वाटप केले. त्यानंतर मछलीखडक, सिटीचौक, सराफा रोड, शहागंज, राजाबाजार संस्थान गणपती, किराणा चावडी, पानदरिबा, सुपारी मारुती मंदिर, गुलमंडीमार्गे ११ वाजता पालखी नाथ मंदिरात पोहोचली. यानंतर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सदानंद देवे यांच्या हस्ते अभिषेक महापूजा करण्यात आली. यावेळी ३१ ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चार केला. महापूजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी महाप्रसाद घेतला. नाथषष्ठी उत्सव यशस्वीतेसाठी रवींद्रकुमार बडे, लक्ष्मणराव थोरात, विष्णू जाधव, दिनकर कोरान्ने, गणेश घुगे, सचिन वाळके, रायभान पाटील सतीश म्हस्के, सोमनाथ शेलार आदी परिश्रम घेत आहेत.
काल्याचे कीर्तन उद्या
शुक्रवारी (दि.९) दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान नाथमंदिरात हभप पद्माकर देशमुख महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात येईल. नाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर सर्व भाविकांना काल्याचे वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: Alarms of 'Bhanadas Eknath' in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.