रांजणगावात दारू विक्री करणारा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:05 AM2021-01-02T04:05:37+5:302021-01-02T04:05:37+5:30
वाळूज महानगर : रांजणगावात अवैधरीत्या देशी दारूची विक्री सुरू असलेल्या ठिकाणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गुरुवारी (दि.३१) सायंकाळी छापा मारला. ...
वाळूज महानगर : रांजणगावात अवैधरीत्या देशी दारूची विक्री सुरू असलेल्या ठिकाणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गुरुवारी (दि.३१) सायंकाळी छापा मारला. या कारवाईत आरोपी राजू साहेबराव शेजवळ (रा. रांजणगाव) यास पकडून त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या अडीच हजार रुपये किमतीच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. येथील एकतानगरात देशी दारूची अवैधरीत्या विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी छापा मारून ४८ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
उद्योगनगरीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांनी हॉटेल, ढाब्यावर पार्ट्यांना जाण्याचे टाळत घरातच कुटुंबीयांसमवेत थर्टी फर्स्ट साजरा केला. रात्री १२ वाजताच अनेकांनी घरातच जल्लोष करीत एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिला. पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्री ११ नंतर हॉटेल व ढाबे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे अनेकांनी घरीच मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत केले.
वाळूजला मोकाट जनावरांचा उपद्रव
वाळूज महानगर : वाळूजला मोकाट जनावरांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरांचे कळप नागरी वसाहतीत धुडगूस घालत असल्यामुळे लहान मुले, महिला व नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. मोकाट जनावरे घरासमोर छोटे उद्यान व झाडांची नासधूस करीत असल्याची ओरड नागरिकांतूृन केली जात आहे. मोकाट जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
बंद कंपनीसमोर कचऱ्याची विल्हेवाट
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या एका बंद कंपनीसमोर कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. या परिसरातील हॉटेल व इतर व्यवसायिक केर-कचरा आणून टाकत असल्यामुळे हा परिसर अस्वच्छ झाला आहे.
पंढरपूर भाजीमंडईत रहदारीस अडथळा
वाळूज महानगर : पंढरपूरच्या भाजी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या भाजीमंडईत दररोज सकाळी व सायंकाळी ग्राहक दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन भाजीपाला खरेदीसाठी येत असतात. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश ग्राहक रस्त्यालगतच वाहने उभी करीत आहेत.