वाळूजला नळांद्वारे येतेय अळ्यांयुक्त दूषित पाणी
By Admin | Published: May 28, 2014 12:53 AM2014-05-28T00:53:08+5:302014-05-28T01:14:24+5:30
वाळूज महानगर : वाळूज भागाला अळ्यांयुक्त दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वाळूज महानगर : वाळूज भागाला अळ्यांयुक्त दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाळूजवासीयांना आठवड्यातून एकदा पाणी मिळते तेही अपुरे. काही खाजगी कंपन्या नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेत असल्या तरी त्यात गावातील काही वरिष्ठ मंडळी आडकाठी आणत आहेत. त्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. नळांद्वारे येणार्या पाण्यात अळ्या व केरकचरा येत असून पाण्याला उग्र वासही आहे. दूषित पाण्याची तक्रार देण्यासाठी नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर गेले असता ते बंद होते. त्यांनी सरपंच रंजना भोंड यांना दूषित पाणी येत असल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ पाहणी करून दूषित पाणीपुरवठा बंद करण्यास सांगितले. तरीही नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दोष जलशुद्धी केंद्रात गावाला एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. नळाच्या पाण्यात अळ्या व केरकचरा येत असल्याने हे पाणी बंद करून स्वच्छ पाणी सोडण्यास सांगितले आहे. यात ग्रामपंचायतीचा दोष नसून एमआयडीसीचा आहे. यासंदर्भात संबंधित अधिकार्यांशी चर्चा केली असून, त्यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे. बहुतेक एमआयडीसीच्या जलशुद्धी केंद्रातच दोष असून शकतो, असे वाळूजच्या सरपंच रंजना भोंड यांनी सांगितले. (लोकमत ब्युरो) ग्रा.पं.चे दुर्लक्ष पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नळाद्वारे येणार्या पाण्यात अळ्या व कचरा असून दुर्गंधीही येत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत अनेक वेळा सांगूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. -संदीप पठारे, रहिवासी आरोग्याला धोका आठवड्यातून एकदा पाणी मिळते; पण ते अळ्यायुक्त व दूषित असते. पाणीटंचाई व ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यातून आजार पसरण्याची शक्यता आहे. -नदीम झुमरवाला, रहिवासी