जिल्ह्यातील सत्तार, शिरसाट, जैस्वाल,बोरनारे चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:19 AM2024-10-23T00:19:41+5:302024-10-23T00:20:18+5:30

शिवसेनेच्या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आले.

All four MLA of Sattar, Shirsat, Jaiswal, Bornare of the district are re-candidating in Election 2024 | जिल्ह्यातील सत्तार, शिरसाट, जैस्वाल,बोरनारे चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी

जिल्ह्यातील सत्तार, शिरसाट, जैस्वाल,बोरनारे चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी

बापू सोळुंके

छत्रपती संभाजीनगर: राज्य विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट)पक्षाने मंगळवारी रात्री ११ :३० वाजता उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली. या यादीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यमान चार आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. यासोबतच जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांना पैठणमधून निवडणुक रिंगणात उतरविण्यात आले आहे. यासोबतच मराठवाड्यातील अन्य पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर आज २२ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज वाटप करण्यास सुरवात झाली आहे. महायुतीतील भाजपने पहिली यादी घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेची पहिली यादी मंगळवारी घोषित करतील, असे त्यांचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी सांगितले होते. त्यानुसार आज रात्री उशिरा शिवसेनेने पहिली यादी एक्स या समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली. शिवसेनेच्या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आले. यात मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोड मधून तर शिवसेना प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांना औरंगाबाद पश्चिम (अनुसूचित जाती प्रवर्ग राखीव)मधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. यासोबतच वैजापूर मधून आ. रमेश बोरनारे यांना तर औरंगाबाद मध्य मतदार संघातून आ. प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा संधी देण्यात आली. तर माजी मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांच्या इच्छेनुसार त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे.

कन्नडचा पेच कायम

कन्नड विधानसभा मतदार संघातून शिंदेसेनेकडून केतन काजे आणि भरत राजपूत इच्छुक आहेत.यासोबतच भाजपच्या संजना जाधव यादेखील तयारी करीत आहे. शिवसेना आणि भाजप ही दोन्ही मतदार संघ कन्नडवर दावा करीत आहेत. कन्नडचा मतदारसंघाचा पेच कायम असल्याने आज कन्नडची उमेदवारी जाहिर झाली नसल्याचे बोलले जाते.

जालन्यातून खोतकर ,परंडा मधून डॉ. सावंत यांना उमेदवारी
छत्रपती संभाजीनगरमधील पाच उमेदवारांसोबतच मराठवाड्यातील नांदेड उत्तर मधून बालाजी देविदास कल्याणकर, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीतून संतोष लक्ष्मण बांगर, जालना मतदार संघातून माजी मंत्री अर्जून पंडितराव खोतकर, धाराशिव जिल्ह्यातील परंडा मधून मंत्री तानाजी सावंत आणि उमरगा (राखीव) मतदारसंघातून विद्यमान आमदार ज्ञानराज चौघुले  यांना शिवसेनेने निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

Web Title: All four MLA of Sattar, Shirsat, Jaiswal, Bornare of the district are re-candidating in Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.