सहकार भारतीचे अखिल भारतीय अधिवेशन नांदेडात
By Admin | Published: September 7, 2014 12:19 AM2014-09-07T00:19:30+5:302014-09-07T00:28:43+5:30
नांदेड : सहकार भारती कार्यकर्त्यांचे अधिवेशन नांदेड येथे आयोजित केली आहे,
नांदेड : महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या, बचत गट स्थापन करणाऱ्या संस्थाचे प्रमुख आणि स्वयंसहाय्यता समूह व संयुक्त दायित्व समूहातील सहकार भारती कार्यकर्त्यांचे दोन दिवसाचे अखिल भारतीय अधिवेशन व कार्यशाळा २० व २१ सप्टेंबर रोजी नांदेड येथे आयोजित केली आहे, अशी माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री विजय देवांगण यांनी पत्रपरिषदेत दिली़
सामान्य लोकांची आर्थिक प्रगती आणि समाजात ऐक्य टिकविण्याची ताकद सहाकारामध्ये आहे, असे देवांगण यांनी सांगितले़ आगामी काळात महिला सक्षमीकरणाला निर्दिष्ट करणारी स्वयंसहायता समूह व संयुक्त दायित्वामध्ये योग्य कार्यकर्ता तयार करणे, समूहाच्या कार्यात गुणग्राहकता आणण्यासाठी तसेच मार्केटिंग, पॅकेजिंग, बँडिगची दिशा ठरवून प्रगतीला चालना देण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले़
कार्यक्रमास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय प्रमुख विजया रहाटकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष समिश मराठे, सहकारी सेवा संस्थानचे कल्पक मणियार, सुधा कोठारी-पुणे, डॉ़ वृषाली किन्हाळकर, चंद्रीका चव्हाण-सोलापूर, विजयाताई भूसारी-नागपूर, भारतीय भट्ट, उद्योजक बी़ बी़ ठोंबरे आदींची उपस्थिती राहील, असेही त्यांनी सांगितले़
बचत गट, स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नेतृत्व तयार करण्याची शक्ती निर्माण होते़ तसेच महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद या क्षेत्रात आहे, असे दिवांगण यांनी सांगितले़ पत्रपरिषदेस अधिवेशनाचे नियोजित स्वागताध्यक्ष आ़ओमप्रकाश पोकर्णा, सहकार भारतीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा भाग्यलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षा संध्याताई कुलकर्णी, सहसंघटनमंत्री विष्णू बोबडे, मधुकर कुलकर्णी, रमेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती़
अधिवेशनातून महिलांना कार्य करण्याची ऊर्जा आणि महिला सक्षमीकरणास नक्की चालना मिळेल, असा विश्वास संध्याताई कुलकर्णी यांनी व्यक्त केला़ तसेच उपस्थित राहण्याचे आवाहन केले़
(प्रतिनिधी)