सर्वच प्रमुख उमेदवार कोट्यधीश

By Admin | Published: September 28, 2014 11:44 PM2014-09-28T23:44:31+5:302014-09-28T23:52:26+5:30

परभणी: जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

All the major candidates are crorepatis | सर्वच प्रमुख उमेदवार कोट्यधीश

सर्वच प्रमुख उमेदवार कोट्यधीश

googlenewsNext

परभणी: जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जिंतूर विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार राम पाटील आहेत. सर्वच प्रमुख उमेदवार कोट्याधीश आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपर्यंत चार विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली. त्यावेळी सर्वच उमेदवारांनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील शपथपत्रात निवडणूक विभागाकडे दिला आहे.
गंगाखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन केंद्रे यांची एकूण १२ कोटी ६६ लाख ३८ हजार ४८२ रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे ९ लाख रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे ३९ लाख १२ हजार ५१२ रुपयांची रोकड आहे. गुट्टे यांच्याकडे १ कोटी ७२ लाख ९२ हजार ४८२ रुपयांची जंगम मालमत्ता असून १० कोटी ९३ लाख ४६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी १२ लाख ६८९ रुपये जंगम मालमत्ता आहे. मधुसूदन केंद्रे यांच्याकडे ६८ लाख ४ हजार ८५ रुपयांची विविध बँकांची देणी आहेत. याच मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजी दळणर यांच्याकडे २ लाख रुपयांची रोकड असून १३ लाख ४८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर २ कोटी ४५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांच्याकडे ४ लाख ८६ हजार ८२९ रुपयांची रोकड असून त्यांच्याकडे ८७ लाख ७० हजार ९९४ रुपयांची जंगम आणि ४ कोटी ८६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. घनदाट यांच्याकडे १ कोटी ६४ लाख रुपयांची विविध बँकांची देणी आहेत.
जिंतूर विधानभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडे २० लाख ९३ हजार ४९७ रुपयांची रोकड असून त्यांच्या पत्नी मीनाताई यांच्याकडे १३ लाख ७२ हजार ७५२ रुपयांची रोकड आहे. बोर्डीकर यांच्या नावे ५ कोटी १४ लाख ६५ हजार ४१९ रुपयांची जंगम तर ६ कोटी ४ लाख १६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. बोर्डीकर यांच्या पत्नी मीनाताई यांच्या नावे ६ कोटी ४१ लाख ८९ हजार रुपयांची जंगम तर ५ कोटी १२ लाख ५२ हजार ५२० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील उमेदवार विजय भांबळे यांच्याकडे ७ लाख ४ हजार १०१ रुपयांची रोकड असून त्यांच्या पत्नी वंदनाताई यांच्याकडे ४ लाख ७५ हजार २०० रुपयांची रोकड आहे. भांबळे यांच्या नावे ३४ लाख ३१ हजार १४८ रुपयांची जंगम तर १ कोटी ३५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. भांबळे यांना ९ लाख ४६ हजार ६३१ रुपयांची विवधि बँकांची देणी आहेत.
परभणी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा महापौर प्रताप देशमुख यांच्याकडे ११ लाख २५ हजार २०० रुपयांची रोकड असून त्यांच्या पत्नी ज्योतीताई देशमुख यांच्याकडे २ लाख २७ हजार ६०० रुपयांची रोकड आहे. देशमुख यांच्याकडे ५९ लाख ६५ हजार ६०० रुपयांची जंगम तर २ कोटी १४ लाख २१ हजार ५०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांना विविध बँकांचे १८ लाख ४६ हजार ८५६ रुपयांचे देणे आहे.
शिवसेनेचे उमेदवार डॉ.राहुल पाटील यांच्याकडे ३४ हजार ७०० रुपयांची रोकड असून त्यांच्याकडे ४३ लाख ४६ हजार ९२६ रुपयांची जंगम तर ६२ लाख ५० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पाटील यांना ४० लाख १४ हजार ७२५ रुपयांचे विविध बँकांचे देणे आहे. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डी.एस.कदम यांच्याकडे ८ लाख ८० हजर ७८८ रुपयांची रोकड असून त्यांच्या पत्नीकडे २ लाख २ हजार ७१ रुपयांची रोकड आहे. कदम यांच्या नावे १२ लाख ८५ हजार २८८ रुपयांची जंगम तर २ कोटी १५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीकडे ११ लाख ९५ हजार ८७२ रुपयांची जंगम आणि २ कोटी ८० लाख ९५ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. कदम यांना विविध बँकांचे २३ लाख ९३ हजार ७ रुपयांचे देणे असून त्यांच्या पत्नीना ६ लाख ६० हजार ५१४ रुपयांचे बँकांचे देणे आहे.
काँग्रेसचे उमेदवार इरफान उर रहेमान खान यांच्याकडे १ लाख रुपयांची रोकड असून त्यांच्या पत्नीकडे २ लाख रुपयांची रोकड आहे. खान यांच्या नावे १७ लाख ४८ हजार रुपयांची जंगम तर २ कोटी ३० लाख रुपयांची स्थावर मालत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे ११ लाख ६० हजार रुपयांची जंगम आणि १ कोटी ४५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. खान यांना १२ लाख ४१ हजार रुपयांचे विविध बँकांचे देणे आहे.
रत्नाकर गुट्टे सर्वाधिक श्रीमंत
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्याकडे ४ लाख ८३ हजार ३०६ रुपयांची रोकड असून त्यांच्या पत्नीकडे ५ लाख २२ हजार २३५ रुपयांची रोकड आहे. तर ५६ कोटी १८ लाख ८६ हजार १३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये त्यांच्याकडील सोने, गुंतवणूक आदींचा समावेश आहे. तर त्यांच्याकडे ७४ कोटी ७६ लाख २७ हजार ८१८ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. गुट्टे यांची ३३ कंपन्यामध्ये गुंतवणूक आहे. त्यांच्या पत्नी सुदामती गुट्टे यांच्याकडे ४४ कोटी ९० लाख १ हजार ६०४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर ५ कोटी ५२ लाख ३४ हजार ३९८ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. रत्नाकर गुट्टे यांच्याकडे १६ कोटी ३२ लाख ८२ हजार ७४६ रुपयांचे विविध बँकेची देणी आहेत. तर त्यांच्या पत्नी सुदामतीताई गुट्टे यांच्याकडे ११ कोटी ५९ लाख ८७ हजार ५२५ रुपयांची विविध बँकांची देणी आहेत. रत्नाकर गुट्टे यांच्या नावावर एकूण ७४ कोटी ७६ लाख २७ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.
जिंतूर मतदासंघात पाटील श्रीमंत
जिंतूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार शिवसेनेचे राम पाटील आहेत. पाटील यांच्याकडे एकूण २० कोटी ९५ लाख ५२ हजार ११७ रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ३ कोटी ७४ लाख ७६ हजार ५५५ रुपयांची मालमत्ता आहे. पाटील यांच्याकडे ६ लाख २० हजार २५८ रुपयांची रोकड असून त्यांच्या पत्नीकडे ५४ हजार रुपयांची रोकड आहे. पाटील यांच्याकडे १० कोटी १९ लाख ४० हजार ९५ रुपयांची जंगम मालमत्ता असून १० कोटी ७६ लाख १२ हजार २२ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पाटील यांना विविध बँकांचे ३ कोटी ६ लाख रुपयांची देणे आहे.
परभणीतून आनंद भरोसे कोट्यधीश
परभणी विधान सभेचे भाजपाचे उमेदवार आनंद भरोसे यांच्याकडे ३१ लाख ४६ हजार ४२३ रुपयांची रोकड असून भरोसे यांच्याकडे एकूण ९८ लाख ५० हजार ७७९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये सोने, बँकेतील ठेवी आदींचा समावेश आहे. तर त्यांच्या पत्नी सूचिताताई यांच्याकडे १४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे दागिने आहेत. भरोसे यांच्याकडे ५९ लाख ३३ हजार ६४६ रुपयांचे विविध बँकांचे देणे आहे. भरोसे यांची परभणी तालुक्यातील कारेगाव, असोला, परभणी शहर, शेंगन दुमाला (ता.पंढरपूर), असोला आदी भागात शेती आहे. या शिवाय औरंगाबाद,मुंबई येथेही त्यांचे प्लॅट असल्याचे शपथपत्रात त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: All the major candidates are crorepatis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.