मराठा आरक्षणासाठी आरपार लढाईची वेळ : राणे
By Admin | Published: February 17, 2016 12:19 AM2016-02-17T00:19:41+5:302016-02-17T00:36:42+5:30
लातूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन उदासीन आहे. सरकारला वर्षे उलटून गेले तरी यांनी न्यायालयात बाजू मांडली नाही ना घोषणा केली नाही. आता विचारांची लढाई विचारांनी लढायचे दिवस गेले
लातूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन उदासीन आहे. सरकारला वर्षे उलटून गेले तरी यांनी न्यायालयात बाजू मांडली नाही ना घोषणा केली नाही. आता विचारांची लढाई विचारांनी लढायचे दिवस गेले. गोळीला गोळीने उत्तर देण्याची वेळ असून मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्याची वेळ आली आहे, आता मागत बसण्यापेक्षा आपल्या भवानी तलवारी परजून आपल्या जातीचा अर्थ सांगण्याची वेळ आली आहे, अशी हाक स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी लातुरात बोलताना दिली.
येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात जिल्ह्यातील सर्व मराठा संघटनांच्या वतीने आयोजित ‘सकल मराठा आरक्षण जनजागृती मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख होते. तर मंचावर माजी आ. वैजनाथ शिंदे, कृउबासचे सभापती ललितभाई शहा, अॅड. श्रीकांत सूर्यवंशी, भगवान माकणे, माधव गंभिरे, विद्याधर कांदे-पाटील, संतोष दगडे-पाटील, संतोष देशमुख, विजय देशमुख, विजयकुमार धुमाळ, दशरथ सरवदे, संतोष कांडेकर, राम जेवरे, संजय पाटील खंडापूरकर, दादा करपे, अॅड. गणेश गोमचाळे, विजय देशमुख, गोविंद बोराडे, अमर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.