आघाडी आता बिघाडीवर, ठाकरे गटाला संपवण्याची शरद पवारांकडून आखणी: संजय शिरसाठ

By संतोष हिरेमठ | Published: September 5, 2024 06:39 PM2024-09-05T18:39:11+5:302024-09-05T18:39:31+5:30

महाविकास आघाडी आता बिघाडीवर आली आहे. त्याची सुरुवात शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

Alliance now on the brink, Sharad Pawar's plan to end the Thackeray group: Sanjay Shirsath | आघाडी आता बिघाडीवर, ठाकरे गटाला संपवण्याची शरद पवारांकडून आखणी: संजय शिरसाठ

आघाडी आता बिघाडीवर, ठाकरे गटाला संपवण्याची शरद पवारांकडून आखणी: संजय शिरसाठ

छत्रपती संभाजीनगर : ‘उबाठा’ गटाला कशाप्रकारे संपवायचे, याची पद्धतशीरपणे शरद पवार यांनी आखणी केली आहे. जास्त आमदार निवडून आणायचे असतील तर जास्त जागा मागाव्या लागतील. जास्त जागा कुणाला भेटतील, हाच महाविकास आघाडीतील सर्वात मोठा प्रश्न आहे. महाविकास आघाडी आता बिघाडीवर आली आहे. त्याची सुरुवात शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला स्विकारत नाही, हे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत, असे शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट म्हणाले.

आ. संजय शिरसाट यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. ज्याचे जास्त आमदार, मुख्यमंत्री त्यांचाच होईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्याविषयी आ. शिरसाट बोलत होते. येणाऱ्या विधानसभेत ‘उबाठा’ गटाने विरोधात बसावे, यासाठी पवारांनी सूचक विधान केले आहे. शरद पवार यांची ‘करायचे एक, बोलायचे एक’ अशी कृती असते. त्यांनी मुख्यमंत्री पदामध्येच रूची दाखविला आहे, असे मत आ. शिरसाट यांनी व्यक्त केले.

सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी
आ. शिरसाट म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नूकसान झाले. याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पंचनाम करून मदतीचे निर्देश दिले आहेत. सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. परंतु राजकीय स्टंटबाजी करू नये.

Web Title: Alliance now on the brink, Sharad Pawar's plan to end the Thackeray group: Sanjay Shirsath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.