दुकाने उघडण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:04 AM2021-05-30T04:04:11+5:302021-05-30T04:04:11+5:30
दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्यास, व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. व्यापाऱ्यांच्या बैठकीत ही एकमुखी मागणी ...
दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्यास, व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. व्यापाऱ्यांच्या बैठकीत ही एकमुखी मागणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले व्यवसाय सुरू ठेवण्यास व्यापाऱ्यांनी ग्वाही दिली. गायकवाड म्हणाले की, व्यापारी व व्यावसायिकांनी बँका व पतसंस्थांकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प झाल्याने, हे कर्ज कसे फेडावे, याची व्यापाऱ्यांना चिंता आहे. दुकाने बंद असल्याने अनेक दुकानदारांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आहे. यावेळी प्रकाश बोथरा, रवींद्र साखरे, मधुकर गुडघे, काशिनाथ भावसार, शोभाचंद संचेती यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.