वाळवणाचे पदार्थ बनविण्यासाठी महिलांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:04 AM2021-04-05T04:04:27+5:302021-04-05T04:04:27+5:30

घाटनांद्रा : उन्हाळा लागताच ग्रामीण भागातील महिलांची पसंती असते ती वर्षभर लागणाऱ्या घरगुती पदार्थ निर्मितीला. घाटनांद्रा परिसरात सध्या घरोघरी ...

Almost women to make drying products | वाळवणाचे पदार्थ बनविण्यासाठी महिलांची लगबग

वाळवणाचे पदार्थ बनविण्यासाठी महिलांची लगबग

googlenewsNext

घाटनांद्रा : उन्हाळा लागताच ग्रामीण भागातील महिलांची पसंती असते ती वर्षभर लागणाऱ्या घरगुती पदार्थ निर्मितीला. घाटनांद्रा परिसरात सध्या घरोघरी शेवया, कारवडी, कुरडई, पापड हे वाळवणाचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. या लगबगीत मैत्रिणी एकमेकींना साहाय्य करीत असल्याने त्यांच्यातील एकोप्याचे दर्शन होत आहे.

घाटनांद्रासह ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळा सुरू होताच शेतातील पिकांच्या आलेल्या गहू, ज्वारी, बाजरी या धान्यापासून शेवया, कुरडया, पापड, खारवड्या, बटाटा चिप्स, चकल्या, साबुदाणा चिप्स आदी विविध वाळवणीचे पदार्थ तयार केले जातात.

वर्षभरात येणाऱ्या विविध सणावाराप्रसंगी बनवून ठेवलेले हे पदार्थ उपयोगी पडतात. दुपारी किंवा सायंकाळी कुरकुरीत पदार्थ म्हणून बाजरीच्या तळलेल्या खारवडयांसोबत शेंगदाणे व कांदा-चटणीचा स्वाद घेतला जातो. आता उन्हाळा चांगलाच जाणवत असून त्याबरोबरच घरा-घरात हे वाळवणीचे पदार्थ बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे.

हल्ली सर्वत्र शेवया, पापड बनविण्याच्या मशीन निघाल्या आहेत. तरी देखील कुरडया, खारवड्या आदी पदार्थ आम्ही महिला स्वत: बनवितो. यानिमित्त मैत्रिणी एकत्र येतात.

- वैशाली चौरंगे, गृहिणी.

फोटो

040421\datta revnnath joshi_img-20210404-wa0022_1.jpg

वाळविण्याचे पदार्थ बनविण्यात मग्न झालेल्या घाटनांद्रा  येथील महिला

Web Title: Almost women to make drying products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.