साथ रोगांचे थैमान

By Admin | Published: June 11, 2014 12:24 AM2014-06-11T00:24:41+5:302014-06-11T00:26:43+5:30

बीड : पावसाळ्यास सुरुवातही झाली नाही तोच साथरोगांनी डोके वर काढले आहे़

Along with the disease | साथ रोगांचे थैमान

साथ रोगांचे थैमान

googlenewsNext

बीड : पावसाळ्यास सुरुवातही झाली नाही तोच साथरोगांनी डोके वर काढले आहे़ आजघडीला धारुर, गेवराई व माजलगाव या तालुक्यातील प्रत्येकी एका गावात उदे्रक झाला आहे़ डेंग्यूचे तब्बल ३६ तर चिकुन गुनियाचे ५ रुग्ण आढळून आले आहेत़ साथरोगांच्या उदे्रकाने आरोग्य यंत्रणा पुरती हादरुन गेली आहे़
माजलगाव तालुक्यातील इर्ला या अडीचशे लोकसंख्येच्या वस्तीवरील २२ जणांना डेंग्यू झाला आहे़ या वस्तीवर ३५ घरे आहेत़ त्यापैकी पाच घरांमधील पाणीसाठ्यांमध्ये एडिस इजिप्ती नावाच्या आळ्या आढळून आल्या आहेत़ २२ रुग्णांचे रक्तनमुने ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत़ त्या सर्वांवर टाकरवण आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत़
दरम्यान, सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ एस़ एम़ सुरवसे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ़ पी़ के़ पिंगळे यांनी भेट दिली़ यावेळी बारा जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले़ ते तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठविले आहेत़ दरम्यान, इर्ला गावात धुरफवारणी केली असून गावात आरोग्य पथक तळ ठोकून आहे़
ढसार वस्तीवरही सात रुग्ण
गेवराई तालुक्यातील ढसारवस्तीवर सोमवारी ७ डेंग्यू रुग्ण आढळून आले़ त्यांच्यावर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ या वस्तीची लोकसंख्या अवघी ७५ इतकी आहे़ येथे धूर फावरणी केली असून नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़ आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावभेट दिली़ यावेळी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सूचनाही केल्या़
खुडूसतांड्यावरही उदे्रक
धारुर तालुक्यातील खुडूसतांडा येथे देखील साथरोगांनी डोके वर क ाढले आहे़ येथील लोकसंख्या ८२ आहे़ त्यापैकी १२ जण साथरोगाच्या विळख्यात सापडले आहेत़ ७ जणांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला असून ५ जणांना चिकुन गुनिया झाला आहे़ येथे देखील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली़ रक्तनमुने तपासणीसाठी घेतले आहेत़
उपाययोजना सुरु
तीन ठिकाणी उदे्रक जाहीर केला आहे़ तेथे आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने धुरफवारणी केली आहे़ रक्तनमुनेही तपासणीसाठी घेतले आहेत़
योग्य त्या उपाययोजना सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांनी सांगितले़ नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस पाण्याचे भांडे स्वच्छ धुवून कोरडे करावेत असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
असा आहे उद्रेक
तालुकासाथरोगरुग्ण
माजलगावडेंग्यू२२
गेवराई डेंग्यू ०७
धारुरडेंग्यू०७
धारुरचि़ गुनिया०५
अशी घ्यावी काळजी
पावसाळा सुरु होत आहे़ त्यामुळे साथरोगांचा उद्रेक होण्याची भीती या काळात जास्त असते़ त्यामुळे स्वच्छ पाणी प्यावे़ साथरोग होऊ नयेत यासाठी डासांचा बंदोबस्त करावा़ त्यासाठी पाण्याचे डोह वाहते करावेत़ नाल्यांची साफसफाई करावी़ शिवाय घराच्या छतावरील टायर, नारळाच्या करवंट्या, ट्यूब व इतर टाकाऊ वस्तुंंचा बंदोबस्त करावा़ पाण्यात तुरटीचा वापर करावा़ लहान मुलांना पाणी उकळून पाजावे, असा सल्ला जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ़ पी़ के़ पिंगळे यांनी दिला आहे़

Web Title: Along with the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.