आधीच महागाई त्यात गॅस सिलिंडरवरही द्यावा लागतोय जीएसटी

By प्रशांत तेलवाडकर | Published: July 2, 2024 04:01 PM2024-07-02T16:01:07+5:302024-07-02T16:02:11+5:30

घरगुती असो वा व्यावसायिक; सिलिंडरवर द्यावा लागतोय जीएसटी

Already with inflation, GST has to be paid on gas cylinders as well | आधीच महागाई त्यात गॅस सिलिंडरवरही द्यावा लागतोय जीएसटी

आधीच महागाई त्यात गॅस सिलिंडरवरही द्यावा लागतोय जीएसटी

छत्रपती संभाजीनगर : तुम्हाला माहिती आहे का, घरगुती सिलिंडरवर ५ टक्के जीएसटी द्यावा लागतो ते! एवढेच नव्हे, तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १८ टक्के जीएसटीचा समावेश असतो.

सिलिंडरच्या किमती कमी झाल्या की, जीएसटीची रक्कम कमी होते आणि वाढले की, रक्कम जास्त होते. तुम्ही सिलिंडर वापरण्याआधीच केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे जमा होतात.

कोणत्या सिलिंडरवर किती टक्के आकारला जातो जीएसटी?
सिलिंडरचा प्रकार - जीएसटी (टक्केवारी)

१) घरगुती सिलिंडर -- ५ टक्के
२) व्यावसायिक सिलिंडर- १८ टक्के

जीएसटीत केंद्र व राज्याचा किती वाटा? घरगुती सिलिंडरवर ५ टक्के जीएसटी लागतो. त्यात केंद्र सरकारचा (सीजीएसटी) व राज्य सरकारचा (एसजीएसटी) निम्मा-निम्मा वाटा असतो.

२०२१ च्या किमतीत सध्या मिळतेय सिलिंडर
महिना वर्ष             घरगुती सिलिंडर किंमत
१) जून २०२०--- ५९८ रु. (सर्वांत कमी)
२) एप्रिल २०२१--- ८१८ रु.
३) जानेवारी २०२३--- १०६१.५० रु.
४) जून २०२४--- ८११.५० रु.

सध्या सिलिंडरमागे ४० रुपये जीएसटी
एप्रिल २०२१ मध्ये घरगुती सिलिंडरचे भाव ८१८ रुपये होते. सध्या ८११.५० रुपये आहेत. यात ५ टक्के जीएसटीच्या ४० रुपये ४५ पैशांचा समावेश आहे.

व्यावसायिक सिलिंडरमागे २९६ रुपये जीएसटी
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १८ टक्के जीएसटीचा समावेश असतो. केंद्र सरकारचा (सीजीएसटी) ९ टक्के, तर राज्य सरकारचा (एसजीएसटी) ९ टक्के जीएसटीचा वाटा असतो. या जून महिन्यात १७३३.५० रुपये सिलिंडरची किंमत आहे. त्यात २९६ रुपये जीएसटीचा समावेश आहे.

चार महिन्यांत कमी झाले १०० रुपयांनी भाव
फेब्रुवारी २०२४ या महिन्यात घरगुती सिलिंडरसाठी ९११.५० रुपये एवढी किंमत मोजावी लागली होती. त्यानंतर मार्चमध्ये १०० रुपये कमी झाले. तेव्हापासून या जून महिन्यापर्यंत ८११.५० रुपये भाव स्थिर आहेत.

व्यावसायिक सिलिंडरच्या भावात १२० रुपये घट
व्यावसायिक सिलिंडरची मार्च महिन्यात १८५३.५० रुपये किंमत होती. दोन महिन्यांत १२० रुपये कमी होऊन आजघडीला १७३३.५० रुपयांना सिलिंडर विकत आहे.

Web Title: Already with inflation, GST has to be paid on gas cylinders as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.