मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी करतो, दोन अडीच वर्षांपूर्वी सर्जरी केली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By संतोष हिरेमठ | Published: September 17, 2024 11:56 AM2024-09-17T11:56:06+5:302024-09-17T11:57:36+5:30

डॉक्टरांना सुविधा देण्याची सरकारची जबाबदारी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Although I am not a doctor I do surgery I did surgery two and a half years ago says Chief Minister Eknath Shinde | मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी करतो, दोन अडीच वर्षांपूर्वी सर्जरी केली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी करतो, दोन अडीच वर्षांपूर्वी सर्जरी केली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संतोष हिरेमठ, छत्रपती संभाजीनगर : मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी करतो, दोन अडीच वर्षांपूर्वी सर्जरी केली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी राजकीय घडमोडीची आठवण करून दिली. यावेळी डॉक्टर हे सर्वसामान्यांसाठी विघ्नहर्ताची भूमिका पार पाडत आहेत. डॉक्टरांना सुविधा देण्याची सरकारची जबाबदारी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)  डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खा. संदीपान भुमरे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड, खा. कल्याण काळे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. प्रदीप जैस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, वैद्यकीय शिक्षण संचालक अजय चंदनवाले, अधिष्ठाता  डाॅ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर, जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी 'आयएमए' अध्यक्ष डॉ. उज्ज्वला दहिफळे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी घाटी रुग्णालयाला विविध सुविधांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. घाटीतील चिठ्ठी मुक्त उपक्रमाचे एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.

औषधी दुकाने बंद, रस्ता बंद, कडेकोट बंदोबस्त
सकाळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घाटी परिसरातील औषधी दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे  पाहायला मिळाले. त्याबरोबरच  मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या वेळी रस्ता बंद केल्याचेही पाहायला मिळाले. घाटी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता

Web Title: Although I am not a doctor I do surgery I did surgery two and a half years ago says Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.