प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या सैनिकाचा अमळनेरात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:05 AM2021-02-07T04:05:22+5:302021-02-07T04:05:22+5:30
बेळगाव येथील मराठा लाइट इन्फंट्रीत बारा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गावी आलेल्या वीस वर्षीय सैनिक शैलेश नंदकुमार साध्ये ...
बेळगाव येथील मराठा लाइट इन्फंट्रीत बारा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गावी आलेल्या वीस वर्षीय सैनिक शैलेश नंदकुमार साध्ये यांचा अमळनेर येथे नागरिकांनी मिरवणूक काढून सत्कार केला. साध्ये कुटुंबीय हे मूळचे बोरगाव जहांगीर (ता. गंगापूर) येथील रहिवासी असून, अमळनेर येथे त्यांचे आजोळ आहे. शैलेश यांचे वडील नंदकुमार दशरथ साध्ये हे सुद्धा भारतीय सैन्यात १७ वर्षांची देशसेवा पूर्ण करून निवृत्त झालेले आहेत. या निमित्ताने अमळनेर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगापूरचे पोलीस उपनिरीक्षक शकील शेख, प्रमुख पाहुणे म्हणून गंगापूरचे नगरसेवक प्रदीप पाटील, पं. स. सदस्य सुमीत मुंदडा, मुख्याध्यापक अय्युब शेख, शिवव्याख्याते दीपक वाबळे यांची उपस्थिती होती. सुरेश पाटील, नामदेव मिसाळ, मनोहर पाटील, अनिल लिपटे, संजय गायकवाड, संजय साध्ये, ज्ञानेश्वर साध्ये, हरिभाऊ साध्ये, दशरथ साध्ये, ज्ञानदेव पठाडे, विजय मिसाळ, राजू मिसाळ, बबनराव मिसाळ, अमोल साळवे, विष्णू मिसाळ आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
----------
फोटो :
सैन्यात भरती झालेल्या शैलेश साध्ये याचा अमळनेर येथे सत्कार करताना नगरसेवक प्रदीप पाटील, पं. स. सदस्य सुमीत मुंदडा, पोलीस उपनिरीक्षक शकील शेख आदी.