अंबड खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

By Admin | Published: August 19, 2016 12:35 AM2016-08-19T00:35:22+5:302016-08-19T00:53:29+5:30

अंबड : अंबड खरेदी-विक्री संघाची चेअरमन, व्हा.चेअरमन निवडणूक पार पडली. यावेळी चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब कनके व व्हा. चेअरमनपदी श्रीराम जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Ambad Purchase Team election uncontested | अंबड खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

अंबड खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

googlenewsNext


अंबड : अंबड खरेदी-विक्री संघाची चेअरमन, व्हा.चेअरमन निवडणूक पार पडली. यावेळी चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब कनके व व्हा. चेअरमनपदी श्रीराम जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अंबड येथे खरेदी-विक्र ी संघाची महिन्यापूर्वी निवडणूक पार पडली. होती. स्व.अंकुशराव टोपे विकास पॅनलचे उमेदवार मोठया मताधिक्याने निवडून आले होते.या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. चेअरमन व व्हा. चेअरमन पदी कोणाचे वर्णी लागेल याची उत्सुक्ता शिगेला पोहचली असताना आ.राजेश टोपे यांनी चेअरमन पदी भाऊसाहेब पा. बप्पासाहेब कनके तर व्हाईस चेअरमनपदी श्रीराम लिंबाजी जाधव यांची निवड केली. नवनिर्वाचित चेअरमन मा.भाऊसाहेब कनके म्हणाले की, शेतकरी हिताचे निर्णय तसेच शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांची उन्नतीसाठी पूरक व्यवसाय व उद्योगधंदे तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करणार आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ. देशमुख म्हणाले की, चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांना आ. टोपे यांनी दिलेल्या संधीचे सोने करुन शेतकऱ्यांसह खरेदी-विक्री संघाच्या कामासाठी जोमाने कामाला लागून विकासाचा रथ पुन्हा त्याच गतीने सुरु ठेवावा. शेतकरी,कष्टकरी व सर्व सामान्य घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, असे ते म्हणाले.
जिल्हाध्यक्ष देशमुख, तालुकाध्यक्ष मनोज मरकड, जि. प. सदस्य अ‍ॅड. संजय काळबांडे, बाजार समिती सभापती सतीश होंडे, पं. स. सदस्य रमेश पैठणे, सतिश वाघमारे, अमोल लहाने, अशोक शिंदे, काकासाहेब कटारे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे, नगरसेवक कैलास भोरे, विक्र म राजपूत, राजू सावंत, जितेंद्र बुर्ले, शिवप्रसाद चांगले, सतिष सोडाणी, कृष्णा राऊत, संतोष सोमाणी, संजय साळवे, बाबासाहेब बोंबले, अशोक गाढे, शिवाजी म्हस्के, अर्जुन भोजने, योगेश पाटील, मनोज साळवे, सचिन खराद, हाजी मनियार, संजय झोटींग, उध्दव पोखरकर, राजू राठोड, सुनिल ठाकुर, गौतम ढवळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Ambad Purchase Team election uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.