आंबेडकरी चळवळ भय्यासाहेबांनी गतिमान केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:17 AM2017-09-18T00:17:28+5:302017-09-18T00:17:28+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी नेटाने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले

 The Ambedkar movement promoted by Bhaiyya Saheb | आंबेडकरी चळवळ भय्यासाहेबांनी गतिमान केली

आंबेडकरी चळवळ भय्यासाहेबांनी गतिमान केली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी नेटाने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले.
सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृतिदिन कार्यक्रमात ते ‘भय्यासाहेब आंबेडकर जीवन आणि कर्तृत्व’ या विषयावर बोलत होते. डांगळे म्हणाले की, धर्मांतरापूर्वी चाचपणीची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मुलावर टाकली होती. भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून चळवळ अधिक गतिमान केली आहे. भय्यासाहेबांचे आंबेडकर भवनातील कार्यदेखील अतिशय नेत्रदीपक आहे. त्यांच्यामुळेच मी स्वत: लेखक, कार्यकर्ता म्हणून पुढे आलो, अशी एक एक कडी अर्जुन डांगळे यांनी भाषणातून उलगडत भय्यासाहेबांनी केलेले समाजासाठीचे योगदान मांडले.
प्रा. अविनाश डोळस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भाष्यकार सुनील कदम, महेश भारतीय यांची उपस्थिती होती. सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत शिरसाठ यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश सांगितला. रमाई विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पक्षातील चार जण एकत्र म्हणजे मूर्खपणा असून, खºयाअर्थाने एससी/एसटी/ओबीसी, मराठा, परिवर्तनवादी ब्राह्मण असा सामाजिक एकोपा निर्माण झाले पाहिजे, असे मत सुनील कदम यांनी मांडले. पाणीमंत्री असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४३ मध्येच अनेक बाबींचे नियोजन मांडले. त्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रारूपही आहे. कामगार, महिला सक्षमीकरण, स्कील डेव्हल्पमेंटही त्याच वेळेसची मांडणी आहे, असे कदम म्हणाले.
‘आंबेडकर भवन इतिहास आणि वर्तमान’ यावर महेश भारतीय म्हणाले, रोहित वेमुलाच्या आईने बौद्ध धम्म येथे स्वीकारल्याने आंबेडकरी चळवळीचे केंद्रच षड्यंत्र करून जातीयवाद्यांनी नष्ट करण्याचे काम रत्नाकर गायकवाड याच्या माध्यमातून केले. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. शासनाच्या विविध यंत्रणाही त्यात असल्याचा आरोप भारतीय यांनी केला. आनंद चक्रनारायण यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी चंद्रसेन वंजारे, प्रा. रेखा मेश्राम, संघपाल भारसाखळे, बुद्धप्रिय कबीर व संयोजकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Web Title:  The Ambedkar movement promoted by Bhaiyya Saheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.