आंबेडकरी तत्त्वज्ञान मांडणीमध्ये नव्या विचारवंतांकडून भेसळ !

By Admin | Published: January 16, 2017 12:57 AM2017-01-16T00:57:01+5:302017-01-16T00:57:23+5:30

लातूर : अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी रात्री उशिरा झाला.

Ambedkar's philosophical structure, newcomers disagree! | आंबेडकरी तत्त्वज्ञान मांडणीमध्ये नव्या विचारवंतांकडून भेसळ !

आंबेडकरी तत्त्वज्ञान मांडणीमध्ये नव्या विचारवंतांकडून भेसळ !

googlenewsNext

लातूर : आंबेडकरी तत्त्वज्ञान हे परिपूर्ण तत्त्वज्ञान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाश्चिमात्य देशात शिकल्यामुळे त्यांच्यावर तेथील विचारवंतांचा प्रभाव असल्याचे सांगून त्यांचे तत्त्वज्ञान मार्क्सवादाशी निगडीत असल्याची मांडणी नवे विचारवंत करतात. मात्र ते खोटे असून, या नव्या विचारवंतांनी सखोल अभ्यास करून आंबेडकरी तत्त्वज्ञान मांडावे, असे मत ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी येथे रविवारी व्यक्त केले.
अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी रात्री उशिरा झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर अस्मितादर्शचे संस्थापक डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. कृष्णा किरवले, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ताराचंद्र खांडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ ग्रंथांचा अभ्यास न करता वरवरचे संदर्भ देऊन मांडणीमध्ये भेसळ होत आहे. त्यामुळे नव्या विचारवंतांनी मूळ ग्रंथांचा सखोल अभ्यास करून मांडणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रास्ताविक प्रा. सुधीर अनवले यांनी केले़ आभार प्रा. जयप्रकाश हुमणे यांनी मानले.

Web Title: Ambedkar's philosophical structure, newcomers disagree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.