अमोल खरातने ४७ चेंडूंत ठोकल्या नाबाद १0४ धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:44 AM2017-12-03T00:44:02+5:302017-12-03T00:44:28+5:30
गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम कमला औद्योगिक टी २0 क्रिकेट स्पर्धेत आकाश खरातने केलेल्या वादळी शतकी खेळीच्या बळावर आयआयए औरंगाबाद संघाने अशक्यप्राय आव्हानही यशस्वीपणे पेलताना शानदार एमसीए संघावर विजय मिळवला.
औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम कमला औद्योगिक टी २0 क्रिकेट स्पर्धेत आकाश खरातने केलेल्या वादळी शतकी खेळीच्या बळावर आयआयए औरंगाबाद संघाने अशक्यप्राय आव्हानही यशस्वीपणे पेलताना शानदार एमसीए संघावर विजय मिळवला. अन्य लढतीत एमआर इलेव्हन संघाने मेघा इलेक्ट्रिकल्स संघावर मात केली.
सकाळच्या सत्रात एमआर इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.३ षटकांत सर्वबाद १३२ धावा केल्या. त्यांच्याकडून ऋषिकेश नायरने ३७ चेंडूंत २ चौकार, एका षटकारासह ३९ व विजय ढेकळे याने १८ चेंडूंत २ षटकार व एका चौकारासह २७ धावा केल्या. प्रतिस्पर्धी संघाकडून आदित्य करडखेडकरने ३0 धावांत ५ गडी बाद केले. चरण राजपूतने ३ व सुनील जोशीने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मेघना इलेक्ट्रिकल संघ ५५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अशोक शिंदेने १४ धावा केल्या. एमआर इलेव्हनकडून सिराज काझीने ५ धावांत ३ व सय्यद जलीसने २ गडी बाद केले. विजय ढेकळे, सईद फिरदोस व व्यंकटेश सोनवलकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसºया सामन्यात एमसीए संघाने २0 षटकांत ३ बाद १८0 धावा केल्या. त्यांच्याकडून शोएब अहमदने ५८ चेंडूंत १२ चौकार, एका षटकारासह ८८ व सय्यद शुजा याने ५६ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ७३ धावा केल्या. आयआयए संघाकडून अमोल खरात व समीर यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. एमसीए संघाने विजयासाठी दिलेले १८१ धावांचे लक्ष्य अमोल खरात याने केलेल्या चौफेर टोलेबाजीच्या बळावर आयआयए संघाने १७.३ षटकांत फक्त ३ फलंदाज गमावून साध्य केले. अमोल खरातने अवघ्या ४७ चेंडूंतच १६ खणखणीत चौकार आणि २ टोलेजंग षटकारासह नाबाद १0४ धावांचा पाऊस पाडला. मिर्झा मसूदने ३४ व अजय राजपूतने १४ धावा केल्या. एमसीए संघाकडून रईस अहमद, राम प्रधान व शोएब अहमद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.