भरारी पथकाने जप्त केली ६३ लाखांची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:05 PM2019-04-16T23:05:40+5:302019-04-16T23:06:07+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून सुरू आहे. आचारसंहितेत निवडणूक विभाग भरारी पथक नेमले आहेत. आतापर्यंत ६३ लाख २९ हजार ९३० रुपयांची रक्कम रोख व दारूसह इतर १६ लाख ८ हजार ५४१ रुपयांचे साहित्य भरारी पथकाने ताब्यात घेतले आहे. एक लाख रुपयापेक्षा जास्त रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून सुरू आहे. आचारसंहितेत निवडणूक विभाग भरारी पथक नेमले आहेत. आतापर्यंत ६३ लाख २९ हजार ९३० रुपयांची रक्कम रोख व दारूसह इतर १६ लाख ८ हजार ५४१ रुपयांचे साहित्य भरारी पथकाने ताब्यात घेतले आहे. एक लाख रुपयापेक्षा जास्त रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.
भरारी पथकांकडून जिल्ह्यात नाकाबंदी करून वाहनांची व्हिडिओ चित्रीकरणासह तपासणी केली जात आहे. बेहिशेबी पैशांची ने-आण करणाºया वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा व जालन्यातील तीन अशा एकूण नऊ विधानसभा मतदारसंघांत ३७ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. औरंगाबाद शहरासह, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आदी ठिकाणी ६३ लाख २९ हजार ९३० रोख, तर १६ लाख ८ हजार ५४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.