कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल; पती - पत्नीने ४ वर्षीय चिमुकलीसह संपवलं जीवन

By बापू सोळुंके | Published: May 19, 2023 12:20 PM2023-05-19T12:20:14+5:302023-05-19T12:20:22+5:30

सातारा पोलिस स्टेशन हद्दीत वळदगाव येथील घटना

An extreme step from a family dispute; Husband and wife end their lives with a 4-year-old child | कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल; पती - पत्नीने ४ वर्षीय चिमुकलीसह संपवलं जीवन

कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल; पती - पत्नीने ४ वर्षीय चिमुकलीसह संपवलं जीवन

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: वळदगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पती - पत्नी आणि चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. मोहन प्रताप डांगर ( 28 ) , पुजा मोहन डांगर ( 24 ) आणि श्रेया ( 4 ) अशी मृतांची नावे आहेत. कौटुंबिक वादातून कुटुंबाने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सातारा पोलिस स्टेशन हद्दीत वळदगाव येथे उपसरपंच संजय झळके यांच्याकडे डांगर कुटुंब भाड्याच्या खोलीत राहते. मोहन प्रताप डांगर ( 28 ) , पुजा मोहन डांगर ( 24 ) आणि श्रेया ( 4 ) हे तिघे येथे राहत. रात्री या दामपत्त्यामध्ये भांडण झाल्यानंतर प्रथम मुलीला गळफास देऊन नंतर पती पत्नीने गळफास घेतला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सातारा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद होत आहे.

दरम्यान, मयताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती कळविण्यात आली असून ते आल्यानंतरच नेमका काय वाद होता हे समोर येईल असे पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार यांनी सांगितले. घरगुती वादातून पती-पत्नीने आधी मुलीला गळफास देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: An extreme step from a family dispute; Husband and wife end their lives with a 4-year-old child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.