रेल्वेरूळ ओलांडताना इंजिनच्या धडकते वृध्द शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 04:14 PM2024-01-10T16:14:55+5:302024-01-10T16:17:36+5:30

आष्टी तालुक्यातील चिंचोली शिवारातील घटना 

An old farmer died on the spot after being hit by an engine while crossing the railway track | रेल्वेरूळ ओलांडताना इंजिनच्या धडकते वृध्द शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

रेल्वेरूळ ओलांडताना इंजिनच्या धडकते वृध्द शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

- नितीन कांबळे
कडा-
सध्या रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असल्याने मालाची वाहतूक करण्यासाठी इंजिन धावत असते. या इंजिनच्या धडकेत एका ७२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. लाभा दिंगाबर गवळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील चिंचोली येथील गवळीवस्तीवरील रहिवासी लाभा दिंगाबर गवळी हे घरापासून जवळच असलेल्या शेतात कामानिमित्त गेले होते. सकाळी  साडेअकरा वाजेच्या दरम्यान ते परत असताना रेल्वेरूळ ओलंडत होते. याच वेळी नगरवरून साहित्य घेऊन येणाऱ्या इंजिनची त्यांना धडक बसली. यात गवळी यांचा जागीच मृत्यू झाला. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी रवाना केला.

Web Title: An old farmer died on the spot after being hit by an engine while crossing the railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.