अन् यांना म्हणे सर्वांच्या आरोग्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:07 AM2017-12-16T01:07:41+5:302017-12-16T01:08:03+5:30

पैठण शहरात विविध ठिकाणी रूग्णालयातील व छोट्या मोठ्या दवाखान्यातील जैविक कचरा टाकण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

 Ana said that everyone's health concerns | अन् यांना म्हणे सर्वांच्या आरोग्याची चिंता

अन् यांना म्हणे सर्वांच्या आरोग्याची चिंता

googlenewsNext

संजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठण शहरात विविध ठिकाणी रूग्णालयातील व छोट्या मोठ्या दवाखान्यातील जैविक कचरा टाकण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. जैव वैद्यकीय कचºयाचे संकलन करणा-या वाटरग्रेस प्रॉडक्ट कंपनीने तर पैठण शहरातील अनेक डॉक्टरांनी त्यांच्याकडे नोंदणीच केली नसल्याची धक्कादायक बाब उघड केली असून शहरात असे २४ डॉक्टर असल्याचे सांगितले.
या डॉक्टरांच्या दवाखान्यातील कचरा शहर परिसरातच टाकला जात आहे. विशेष म्हणजे याबाबत न.प. मुख्याधिकाºयांनी बोलावलेल्या बैठकीकडेही डॉक्टरांनी पाठ फिरवल्याने प्रशासन आता कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. शहरातील सर्व जैव वैद्यकीय कचºयाचे संकलन करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागत नसल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील रुग्णालयांमधील वैद्यकीय कचरा उचलण्याची जबाबदारी औरंगाबाद मनपाच्या अंतर्गत येणाºया वाटरग्रेस प्रॉडक्ट बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प युनिटकडे आहे. या युनिटचे औरंगाबाद येथून दिवसाआड वाहन पैठण येथे येऊन विविध रूग्णालयातून वैद्यकीय कचºयाचे संकलन करते. या कचरा संकलनासाठी हॉस्पिटलमधील बेडनुसार दर आकारले जातात. पैठण शहरात २० मोठे रूग्णालये तर २५ क्लिनिक आहेत. शिवाय रक्ततपासणी प्रयोगशाळा व मेडिकलची संख्याही मोठी आहे.
यामुळे शहरात दररोज मोठा वैद्यकीय कचरा निर्माण होतो. परंतु संकलनाची व्यवस्था असतानाही काही दवाखाने, रक्तपेढ्या व प्रयोगशाळांमधून नियमित कचरा संकलन होत नाही. निर्माण होणारा कचरा सामान्य कचºयातच टाकला जातो. वैद्यकीय कचºयामध्ये रोगजंतू असण्याचा धोका असतो. सामान्य कचºयातून या रोगजंतूंचा प्रसार होण्याची भीती असते. त्यामुळे या कचºयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते. हा जैव कचरा अतिशय धोकादायक असल्याने फार काळजी घ्यावी लागते. परंतु शहरातील २४ डॉक्टरांना याचे गांभीर्य नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.
जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार जैव कचºयाची विल्हेवाट नियमानुसार होत नसेल तर कारवाई करण्याचे अधिकार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देण्यात आले आहेत. शहरात जैविक कचरा टाकून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करणाºया डॉक्टरांच्या विरोधात नगरपरिषद राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याची हिंमत दाखवेल का हाही एक मोठा प्रश्नच आहे. तर दुसरीकडे वाटरग्रेस कंपनीकडे नोंदणी नसलेल्या डॉक्टरांनी कचºयाची विल्हेवाट कोठे व कशी लावली, याबाबत चौकशी होणेही गरजेचे आहे.
न.प.च्या बैठकीकडे डॉक्टरांची पाठ
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता उपक्रमाबाबत जैविक कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी ८ डिसेंबर रोजी बोलविलेल्या बैठकीकडे शहरातील डॉक्टरांनी पाठ फिरवली. या बैठकीस डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मदन मानधने या एकमेव डॉक्टरांनी उपस्थिती लावली. या प्रकारामुळे स्वच्छतेविषयी डॉक्टरांची असलेली अनास्था समोर आली आहे.
स्वच्छतेच्या उपक्रमाबाबत डॉक्टरांची बैठक बोलविण्यात आली होती. परंतु बैठकीला डॉक्टर आले नाहीत. त्यामुळे जैविक कचºयाच्या विल्हेवाट लावण्याचा प्रश्नावर चर्चा झाली नाही. बैठकीला गैरहजर असल्याने खुलासा करण्याबाबत शहरातील सर्व रुग्णालयांना नोटीस देण्यात येईल व जिल्हाधिकाºयांना अहवाल पाठविण्यात येणार आहे.
-सोमनाथ जाधव, मुख्याधिकारी, न.प. पैठण
जैविक कचºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील डॉक्टरांनी बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जैविक कचरा आरोग्यास हानिकारक असल्याने या कचºयाची विल्हेवाट नियमानुसार होणे गरजेचे आहे. याबाबत डॉक्टरांची बैठक घेण्यात येईल.
-डॉ. मदन मानधने, अध्यक्ष, पैठण तालुका डॉक्टर्स असोसिएशन

Web Title:  Ana said that everyone's health concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.