आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप

By बापू सोळुंके | Published: September 28, 2024 02:11 PM2024-09-28T14:11:25+5:302024-09-28T14:12:31+5:30

आनंद दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला : संजय शिरसाट

Anand Dighe was killed; Serious accusation of Sanjay Shirsath, demands investigation | आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप

आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर: धर्मवीर आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये दिघे उपचार घेत होते ते हॉस्पिटल कायम बंद का करण्यात आले, असा सवाल करत शिरसाट यांनी दिघेचा यांचा मृत्यू का झाला याची चौकशी करण्याची मागणी केली.

संजय शिरसाठ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिघे यांच्या मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यात प्रत्येक जण दिघे यांचा घातपात झाल्याचा आरोप करतात. दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला असा सवाल शिरसाठ यांनी केला आहे.

दिघे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी 
यावेळी शिरसाठ म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून दिघे यांचा मृत्यू कसा झाला याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे या प्रकरणात चौकशी करण्यात यावी अशी माझी मागणी असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले. तसेच इतके वर्ष झाले ते हॉस्पिटल सुरू का झाले नाही ही सर्वांच्या मनात शंका कायम आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये नेत्याचे मृत्यू झाले आहेत. मात्र ते हॉस्पिटल कधीही बंद झाले नाहीत. मात्र इथेच असे का झाले असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Anand Dighe was killed; Serious accusation of Sanjay Shirsath, demands investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.