... तर ६९ आकडेबहाद्दरांवर फौजदारी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:37 AM2017-08-26T00:37:30+5:302017-08-26T00:37:30+5:30

: विद्युत वितरण कंपनीकडून सध्या वीजचोरी करणाºयांविरूद्ध धडक मोहीम सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात पथके तैनात करण्यात आली असून वीजचोरी करणाºयांवर कारवाई केली जात आहे. २४ आॅगस्ट रोजी महावितरणने सात गावांत जाऊन ६९ आकडेबहाद्दर पकडले. त्यांनी दंड न भरल्यास थेट फौजदारी होणार आहे.

... and 69 figures will be criminalized | ... तर ६९ आकडेबहाद्दरांवर फौजदारी होणार

... तर ६९ आकडेबहाद्दरांवर फौजदारी होणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विद्युत वितरण कंपनीकडून सध्या वीजचोरी करणाºयांविरूद्ध धडक मोहीम सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात पथके तैनात करण्यात आली असून वीजचोरी करणाºयांवर कारवाई केली जात आहे. २४ आॅगस्ट रोजी महावितरणने सात गावांत जाऊन ६९ आकडेबहाद्दर पकडले. त्यांनी दंड न भरल्यास थेट फौजदारी होणार आहे.
जिल्ह्यात वीजचोरीचे वाढते प्रमाण व त्यामुळे होणारा इतरांना त्रास डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात तर अनेकवेळा आकडे टाकताना अचानक विजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे रात्रभर वीज खंडित असते. मागील चार दिवसांपासून महावितरणने वीजचोरी करणाºया आकडेबहाद्दरांविरूद्ध मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाभरात आता मोहीम राबविली जाणार आहे. वीजचोरीमुळे महावितरणचे होणारे नुकसान व खोळंबणाºया वीजपुरवठ्यामुळे आता वीजचोरी करणाºयांवर महावितरणकडून फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी दिली.
...तर कारवाईतून सुटका - वीजचोरी प्रकरणातील कारवाई करयण्यात आलेल्यांनी जर महावितरणकडे येऊन दंड भरल्यास फौजदारी कारवाईतून सुटका करता येईल. परत वीजचोरी करणार नाही, असे पत्रही संबधितांकडून भरून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. दंड भरणाºयांचीच कारवाईतून सुटका करून होईल, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

Web Title: ... and 69 figures will be criminalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.