अन् वाळूची वाहने तहसीलमध्ये लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 11:56 PM2017-03-24T23:56:43+5:302017-03-24T23:57:18+5:30
वाशी : वाळू तस्करी प्रकरणात घटनास्थळावरून फरार होणाऱ्या ट्रक चालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच पळून गेलेल्या चालकांनी आपापली सहा वाहने तहसीलच्या आवारात आणून लावली़
वाशी : वाळू तस्करी प्रकरणात घटनास्थळावरून फरार होणाऱ्या ट्रक चालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच पळून गेलेल्या चालकांनी आपापली सहा वाहने तहसीलच्या आवारात आणून लावली़ ही घटना वाशी तालुक्यातील फक्राबाद परिसरात घडली़ या वाहनांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होती़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील फक्राबाद येथील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सुरेंद्र डोके यांना मिळाली होती़ या माहितीवरून डोके व त्यांच्या पथकाने नदीपात्रात वाळूउपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली़ त्यावेळी वाशी येथील शिवराज घुले, राजेंद्र वसंतराव उंदरे, बारीकराव मारूती उंदरे, राजेंद्र अर्जुन उंदरे व नेताजी चेडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर आढळला. सदरील ट्रॅक्टर चालकाना ट्रॅक्टर तहसीलच्या आवारात घेऊन येण्यास सांगण्यात आले़ मात्र, तरीही काहींनी ट्रॅक्टरमध्येच तांत्रिक बिघाड केला तर काही चालकांनी ट्रॅक्टर वेगाने पळवून नेला. त्यानंतर डोके यांनी गौण खजिन संपत्तीची चोरी करण्याचा गुन्हा संबंधित चालकांवर नोंदवावा, असे आदेश दिल्याची माहिती मिळाल्यानंतर चालकांनी स्वत:हून वाहने तहसीलच्या आवारात आणून उभा केल्याची माहिती प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी दिली. या कारवाईवेळी तलाठी शिवाजीराव उंदरे, भिक्कड, कोतवाल अशोक सुरवसे व चालक कुंडलिक पांचाळ यांनी भाग घेतला. (वार्ताहर)