...अन् दगड बोलू लागले! छिन्नी हातोड्याच्या घावातून तरुणाईची लक्षवेधी शिल्पांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 02:01 PM2022-02-08T14:01:18+5:302022-02-08T14:02:21+5:30

कार्यशाळेत पहिल्या दिवशी खदानीवरून दगड निवडून आणण्यापासून दगडी शिल्प घडविण्याचा प्रवास खूप मेहनतीचा राहिला.

... and stones started talking! Unique creation of youth from hammer | ...अन् दगड बोलू लागले! छिन्नी हातोड्याच्या घावातून तरुणाईची लक्षवेधी शिल्पांची निर्मिती

...अन् दगड बोलू लागले! छिन्नी हातोड्याच्या घावातून तरुणाईची लक्षवेधी शिल्पांची निर्मिती

googlenewsNext

औरंगाबाद : लेण्यांच्या शिल्प प्रतिकृती किंवा दगडी शिल्पाचे काम करणाऱ्या कलावंतांची संख्या देशभरातच फारच कमी आहे. या कलेची जोपासना सध्याच्या काळाची गरज आहे. त्यासाठी राज्यभरातील कलाकारांचा समन्वय, कलेला प्रोत्साहन आणि नवे तंत्र आत्मसात करण्यासाठी दगडी शिल्पकलेच्या कार्यशाळांचा मोठा हातभार लागत असल्याचे मत यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरवणे यांनी माडले.

यशवंत कला महाविद्यालयात शंकरराव बेडसे यांच्या जयंतीनिमित्त दुसरी राज्यस्तरीय दगडी शिल्पकला कार्यशाळा घेण्यात आली. १० दिवसीय कार्यशाळेत जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी प्राध्यापक मधुकर वंजारी यांनी सहभागी कलाकारांना मार्गदर्शन केले. २४ जानेवारीपासून सुरू झालेल्या कार्यशाळेत पहिल्या दिवशी खदानीवरून दगड निवडून आणण्यापासून दगडी शिल्प घडविण्याचा प्रवास खूप मेहनतीचा राहिला. ते पाहून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानिक संवर्धनाचे औरंगाबाद मंडळाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्राही भारावले. देशभरात लेण्यांच्या संवर्धनात शिल्पकलाकार मिळणे अवघड झाले आहे. तीन बाय साडेतीन फुटांच्या दगडी शिल्पासाठी लागणाऱ्या मेहनतीवरून शेकडो वर्षांपूर्वी कोरलेल्या भव्य लेण्यांसाठी त्या कलाकारांनी किती मेहनत घेतली असेल, याची प्रचिती येते, असे ते म्हणाले. यावेळी प्रा. शुभम साळवे, प्रा. पंढरीनाथ खैरनार, पूनमचंद देशवाल, सरिता उंबरकर, अभिजित पाटील, आदींची उपस्थिती होती.

लक्षवेधी शिल्पे...
चरायला जाणाऱ्या गायी, डोळ्यांतील राक्षस यासह समाजातील घडामोडीचे प्रतिबिंब उमटवणारी शिल्पे कलावंतांनी घडविली. नवनाथ फेंगसे, योगेश लोखंडे, अरविंद मंगल, अभिषेक साळवे, शुभम साळवे, साईनाथ आडे, आकाश जमदार, विजय पावसकर, किशोर तायडे, रोहित वारेकर, कैलास आडे, शुभम जाधव, दर्शन खारतमाल, मंगेश फुलारी, संकेत उबाळे, ओंकार वाकडे, आदी कलावंतांनी या कार्यशाळेत सहभाग घेत लक्षवेधी शिल्पे साकारली.

Web Title: ... and stones started talking! Unique creation of youth from hammer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.