...अन् जनावरांचे बाजार बंदचा निर्णय झाला, सर्वाधिक देशी पशुधन लम्पीच्या कचाट्यात

By विजय सरवदे | Published: September 5, 2023 08:33 PM2023-09-05T20:33:11+5:302023-09-05T20:33:35+5:30

लम्पीमुळे प्रामुख्याने देशी जनावरेच सर्वाधिक बाधित असून तुलनेने संकरीत जनावरांना कमी प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे.

...And the animal market was decided to be closed, most of the native livestock in Lumpy | ...अन् जनावरांचे बाजार बंदचा निर्णय झाला, सर्वाधिक देशी पशुधन लम्पीच्या कचाट्यात

...अन् जनावरांचे बाजार बंदचा निर्णय झाला, सर्वाधिक देशी पशुधन लम्पीच्या कचाट्यात

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : गोवंशीय जनावरांसाठी जीवघेणा ठरलेल्या ‘लम्पी’ त्वचारोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अखेर सोमवारी जनावरांचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. ‘लम्पी’ला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग शर्थीने प्रयत्न करत असताना दुसरीकडे बाजाराच्या माध्यमातून जनावरांचे जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा स्थलांतर सुरूच होते. बाजार बंद करण्याचा पशुसंवर्धन विभागाचा प्रस्ताव असतानाही निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वेळ नाही, यासंदर्भात ‘लोकमत’ने १ सप्टेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोमवार, ४ सप्टेंबर रोजी जनावरांचे बाजार बंद संदर्भात घेतलेल्या निर्णयाद्वारे जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची खरेदी-विक्री, जनावरांचे प्रदर्शन, जनावरांची शर्यत व बाजार भरविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जनावरांचे २८ दिवसांपूर्वी लम्पी प्रतिबंधक लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांची आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत वाहतूक करता येणार नाही. पशुपालकांना लम्पी बाधित जनावरे गोठ्यापासून बाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली.

यंदा एप्रिलपासून लम्पीने हळूहळू संपूर्ण जिल्हा कवेत घेतला आहे. लम्पीमुळे प्रामुख्याने देशी जनावरेच सर्वाधिक बाधित असून तुलनेने संकरीत जनावरांना कमी प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. एकीकडे निसर्गाने, तर दुसरीकडे लम्पीने यावर्षी शेतकऱ्यांची सत्वपरीक्षाच घेतली आहे. या पाच महिन्यांत १ हजार ७५८ जनावरांना लम्पीची लागण झाली असून पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर ५ लाख ३५ हजार ९८५ गोवंशीय जनावरांचे लसीकरण केल्यामुळे यापैकी १ हजार १७६ जनावरे बरी झाली आहेत. सध्याही ५०६ जनावरे या आजाराने त्रस्त असून ७६ जनावरे दगावली आहेत. ६१ जनावरांची स्थिती गंभीर आहे.

बाधित तालुके - ०९
बाधित पशुधन - १,७५८
बरे झालेले पशुधन - १,१७६
लम्पीने त्रस्त पशुधन - ५०६
गंभीर पशुधन - ६१
दगावलेले पशुधन - ७६
एकूण गोवंश पशुधन - ५,३८,५७२
लसीकरण झालेले पशुधन - ५,३५,९८५

Web Title: ...And the animal market was decided to be closed, most of the native livestock in Lumpy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.