आंध्र प्रदेश सीमावर्तीचे फलक तेलंगणात झाले रुपांतर
By Admin | Published: June 14, 2014 01:18 AM2014-06-14T01:18:02+5:302014-06-14T01:20:24+5:30
बिलोली: मराठवाड्याच्या दक्षिणेला असलेल्या आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन होवून २९ वे नवीन तेलंगणा राज्य अस्तित्वात येताच
बिलोली: मराठवाड्याच्या दक्षिणेला असलेल्या आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन होवून २९ वे नवीन तेलंगणा राज्य अस्तित्वात येताच सीमेवर असलेल्या स्वागतांचे व राज्य प्रारंभाचे फलक बदलण्यात आले आहेत़ दरम्यान, वाहनांवरील एपी ऐवजी टीएस अशा क्रमांकाचा बदल होणार आहे़
मराठवाड्याच्या दक्षिणेला नांदेड जिल्ह्याच्या बिलोली, धर्माबाद व देगलूर सीमेवर तेलंगणा या नवनिर्मित राज्याची सुरुवात होते़ युपीए सरकारच्या सत्तेवेळी स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी मिळाली़ पण प्रत्यक्षात २ जून रोजी स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाली़ याच दिवशी तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष टी़चंद्रशेखरराव यांना तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रशेखरराव यांनी मेदक येथून लोकसभा निवडणूक जिंकली़ पण मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला़ आता मेदक लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे़ काँग्रेसप्रणीत युपीए शासनाने नव्या २९ व्या राज्याची निर्मिती केली़ आता सीमेवरील फलक, साईन बोर्ड, कार्यालयांचे फलक आदी आंध्र प्रदेश बदलून तेलंगणा झाले़ (वार्ताहर)