अंगणवाडीच्या खिचडीत शिजली पाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:57 AM2017-09-02T00:57:27+5:302017-09-02T00:57:27+5:30

अंगणवाडीतील पोषण आहाराअंतर्गत शिजविण्यात आलेल्या खिचडीत पालीचे मुंडके आढळून आल्याने खिचडी खाणाºया विद्यार्थिनीसह एका पालकास उलट्या झाल्या

 Anganwadi khichadite khichadite pail | अंगणवाडीच्या खिचडीत शिजली पाल

अंगणवाडीच्या खिचडीत शिजली पाल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : अंगणवाडीतील पोषण आहाराअंतर्गत शिजविण्यात आलेल्या खिचडीत पालीचे मुंडके आढळून आल्याने खिचडी खाणाºया विद्यार्थिनीसह एका पालकास उलट्या झाल्याने त्यांना पैठण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही खळबळजनक घटना शुक्रवारी नवीन दादेगाव येथे घडली.
उपचारानंतर दोघा रूग्णांना घरी पाठविण्यात आले. अंगणवाडीतील २५ विद्यार्थ्यांनी ही खिचडी खाल्ली; परंतु त्यांना कुठलीही बाधा झाली नाही. दरम्यान, खिचडी शिजविणाºया अंगणवाडी मदतनीसच्या निष्काळजीपणामुळे पाल खिचडीमध्ये शिजली असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील नवीन दादेगाव येथे सकाळी अंगणवाडीतील मदतनीसने खिचडी शिजवून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दिली. यापैकी एका विद्यार्थिनीने खिचडी न खाता डब्बा तसाच घरी नेला. मुलीने डब्यात आणलेली खिचडी फेकून देण्यापेक्षा खाल्लेली बरी, म्हणून मुलीची आई राणी संदीप पवार (२५) यांनी डबा उघडून खिचडी खाण्यास प्रारंभ केला. दोन-चार घास खाताच खिचडीत शिजलेले पालिचे मुंडके आढळून आले. पालीचे मुंडके दिसताच त्यांना मोठी किळस आली व मळमळ होऊन त्यांना उलटी झाली. याबाबत त्यांनी गावकºयांना माहिती देऊन दक्षता घेण्याबाबत सूचविले. या दरम्यान अंगणवाडीत खिचडी खाणारी सानिया शकील शेख (४) हिला उलटी झाल्याने गावकºयांनी दोघांनाही पैठण येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. या दोघावरही डॉ. संदीप रगडे यांनी उपचार केले. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही रूग्णांना सायंकाळपर्यंत रूग्णालयात ठेवण्यात आले. खिचडीत पाल आढळून आल्याची खबर मिळताच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जोत्स्ना गहेरवार यांनी दखल घेत दादेगाव येथे वरिष्ठ पर्यवेक्षक श्रीमती पाटील यांना पाठवून अंगणवाडीच्या विद्यार्थ्यावर नजर ठेवली.

Web Title:  Anganwadi khichadite khichadite pail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.