अंगणवाडीसेविका, मदतनिसांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:46 AM2017-09-15T00:46:40+5:302017-09-15T00:46:40+5:30
येथील जिल्हा परिषदेवर विविध मागण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी महाराष्टÑ राज्य अंगणवाडीसेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा परिषदेवर विविध मागण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी महाराष्टÑ राज्य अंगणवाडीसेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले.
मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडीसेविका व मदतनिसांचा मागण्या शासनाकडून मान्य केल्या जात नाहीत. अनेकदा मोर्चे काढूनही काहीच उपयोग झालेला नसल्याचा रोष या कर्मचाºयांमध्ये दिसून येत आहे. शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने अंगणवाडीसेविका व मदतनिसांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजी पुन्हा जि.प.वर विविध मागण्यासाठी मोर्चा काढला.
मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने अंगणवाडीसेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडीसेविकांचे मानधन पाच तारखेपर्यंत द्यावे, प्रकल्पनिहाय प्रलंबित मानधनाचा आढावा घेऊन थकित मानधन तत्काळ अदा करावे, अंगणवाडीसेविकांचे मानधन वाढविण्यात यावे, तसेच ‘पीएफएमएस’द्वारे होत असलेले मानधन, बºयाच अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मिळत नाही. त्यामुळे मानधन मिळण्यातील त्रुटी दूर करुन मानधन मिळवून द्यावे, अंगणवाडीसेविका व मदतनिस दोघींनाही एकदाच एक महिना उन्हाळी सुट्या द्याव्यात, एक महिन्यांची आजारी रजा द्यावी अशा १३ मागण्यांसाठी जि. प.वर मोर्चा काढला. यामध्ये पाचही तालुक्यातील अंगणवाडीसेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा गांधी चौक येथून जि. प. कार्यालयापर्यंत काढला होता.