अंगणवाडी कार्यकर्तीची पर्यवेक्षिकांना मारहाण
By Admin | Published: August 26, 2015 11:54 PM2015-08-26T23:54:07+5:302015-08-26T23:54:07+5:30
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे अंगणवाडी केंद्रात बैठक चालू असताना कार्यकर्ती निर्मला देशपांडे हिने बैठकीत अंडी, केळी वाटप का केली नाही,
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे अंगणवाडी केंद्रात बैठक चालू असताना कार्यकर्ती निर्मला देशपांडे हिने बैठकीत अंडी, केळी वाटप का केली नाही, याची विचारणा केली म्हणून पर्यवेक्षिका एस.के. शिंदे यांना मारहाण केल्याची तक्रार रांजणी चौकीत दिली आहे.
सकस आहार वाटपात केळी, अंडी बालकांना दिली जाते. याच कारणाहून ग्रामसभेतही चांगलीच चर्चा झाली होती. झालेल्या घटनेचा रांजणी विभागातील कार्यकर्ती मदतनीस यांनी निषेध केला असून, गुरुवारी कामबंदचा निर्णय घेतला आहे. याच संदर्भात कार्यकर्ती निर्मला देशपांडे यांनी चौकीत तक्रार दिली असून, पर्यवेक्षिका पैशांची मागणी करतात, जाणूनबुजून पगार कपात करतात व खोटे आरोप करतात, अशी तक्रार दिली आहे.
रांजणी येथील अंगणवाडी केंद्रामधील कार्यकर्ती हिने बुधवार असूनही केळी, अंडी वाटप केली नसल्याने तिला विचारले असता तिने पर्यवेक्षिकेला मारहाण केली. हा प्रकार दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडला. घटनेची माहिती तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी एस.एन. झरे यांना दिली. कार्यकर्ती मदतनीस यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.