अंगणवाडी सेविका नॉट रिचेबल, ऑफलाइन अहवालाचा ताण वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:02 AM2021-09-15T04:02:02+5:302021-09-15T04:02:02+5:30
औरंगाबाद : अंगणवाडी सेविका सध्या नॉट रिचेबल आहेत. कारण आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी त्यांच्याकडील मोबाइल परत केले आहेत. ...
औरंगाबाद : अंगणवाडी सेविका सध्या नॉट रिचेबल आहेत. कारण आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी त्यांच्याकडील मोबाइल परत केले आहेत. हे आंदोलन राज्यभर चालू असून, मोबाइलच्या संदर्भात प्रचंड तक्रारी वाढलेल्या आहेत. यातून त्यांच्या कामाचा व्याप वाढला आहे.
.............. १) जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या - ३ हजार ४५५ - अंगणवाडी सेविका - ३ हजार २५०
- किती जणींनी केला मोबाइल परत - दहा टक्के अंगणवाडी सेविकांनी
२) ...म्हणून केला मोबाइल परत....
केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर ॲप दिले आहे ते इंग्रजीत आहे. त्यामुळे इंग्रजीत काम करणे शक्य होत नाही. हे ॲप मराठीत देण्यात यावे, ही प्रमुख मागणी आहे. मोबाइलची क्वाॅलिटी चांगली नाही. ते कमी क्वाॅलिटीचे आहेत व वारंवार खराब होतात. त्याचा दुरुस्तीचा खर्चच चार ते पाच हजार रुपये इतका जातो. कधी कधी सात हजार रुपये येतो. ग्रामीण भागातील महिलांना दुरुस्तीसाठी औरंगाबादला यावे लागते. मोबाइल चांगल्या कंपनीचे द्यावेत आणि दुरुस्तीचा खर्च सरकारने करावा, म्हणूनही खराब मोबाइल परत करण्याचे आंदोलन राज्यभर सुरू आहे.
३) कामाचा व्याप... १७ रजिस्टर भरावे लागतात. वजन-उंची, किती प्रमाणात बालक कुपोषित आहेत, कुपोषणाचे प्रमाण किती आहे, त्यांची प्रकृती कशी आहे, गर्भवती महिला किती आहेत, आरोग्य शिबिरे घेतली का, याबद्दल माहिती भरावी लागते. तीन वर्षांची किती मुले आहेत, तीन ते सहा वर्षांपर्यंतची किती मुले आहेत, गर्भवती महिला किती आहेत, अशी माहिती भरावी लागते.
४) असून अडचण नसून खोळंबा...
२७ ऑगस्टपासून आमचे आंदोलन सुरू आहे. जुजबी मानधनात आम्ही काम करतो. त्यात मोबाइल दुरुस्तीचा खर्चही आम्हालाच करावा लागतो. मोबाइल अत्यंत खराब क्वाॅलिटीचे आहेत. ते वारंवार हँग होतात. शिवाय ॲप इंग्रजीत आहे, ते मराठीत व्हायला पाहिजे. मी पैठण तालुक्याची युनियनची अध्यक्ष आहे. आमच्या तालुक्यातून जवळपास १५० ते २०० मोबाइल आम्ही परत केले आहेत.
- मीरा अडसरे, पैठण
............
फोर जीबीचा मोबाइल हवा...
सध्या आमच्याकडचे मोबाइल टू जीबीचे आहेत. ते फोर जीबीचे हवेत. गंगापूर तालुक्यातून आम्ही १२५ मोबाइल परत केले आहेत.
.........
दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांचं पत्र आलंय...
दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांचं पत्र आलंय. नादुरुस्त मोबाइल दुरुस्तीला टाकायला सांगण्यात आलं आहे. मोबाइल परत करण्याचं आंदोलन प्रतीकात्मक आहे. ७ ते ८ अंगणवाडी सेविकांनी मोबाइल परत केले असावेत. टू जीबी मोबाइलवर काम होत नाही. ते वारंवार हँग होतात, पाण्यापावसामुळे खराब होतात. या तक्रारींवरून हे आंदोलन सुरू आहे. सध्या अंगणवाड्या तशाही सुरू नाहीत.
- प्रसाद मिरखेले, उपायुक्त, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद
(डमी स्टार ११७६) -