जिल्ह्यात अंगणवाड्यांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:06 AM2021-03-07T04:06:25+5:302021-03-07T04:06:25+5:30
जिल्हा परिषद:ः १४ सीडीपीओ कार्यालयांपैकी ५ ठिकाणी स्वच्छतागृह नाहीत, तर ३ नादुरुस्त औरंगाबाद : जिल्ह्यात ३४५५ अंगणवाड्या असून, त्यापैकी ...
जिल्हा परिषद:ः १४ सीडीपीओ कार्यालयांपैकी ५ ठिकाणी स्वच्छतागृह नाहीत, तर ३ नादुरुस्त
औरंगाबाद : जिल्ह्यात ३४५५ अंगणवाड्या असून, त्यापैकी २६८४ अंगणवाड्यांना इमारती आहेत. तर ७७१ ठिकाणी इमारती नाहीत. त्यामुळे २०२०-२१ मध्ये १२५ ठिकाणी इमारती बांधण्याचे नियोजन असून, २०१९-२० मध्ये मंजूर ७४ पैकी ५८ अंगणवाड्या बांधण्याचे कार्यादेश निघाले असून, काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागाचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वाय. मिरकले यांनी दिली.
बालविकासाचे जिल्ह्यात १४ प्रकल्प असून, त्यांच्यासाठी असलेल्या कार्यालयात महिला सीडीपीओ काम करतात. मोठ्या २७०४ तर लहान ८०६ केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी फुलंब्री तालुक्यात मोठी एक अंगणवाडी तर लहान ५४ अंगणवाड्या अद्याप कार्यान्वित नाहीत. या अंगणवाड्यांचा कार्यभार पाहण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांना चांगले स्वच्छतागृह नाहीत. १४ सीडीपीओ कार्यालयांपैकी ५ ठिकाणी स्वच्छतागृह नाहीत, तर ३ नादुरुस्त त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता गृहांची व्यवस्था करण्याची मागणी महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी केली. त्यावर रमेश गायकवाड यांनीही जीर्ण इमारतींची दुरुस्ती व कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा निर्णाण करण्याची गरज असल्याचे सांगितले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गाेंदावले यांनीही याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन याच वर्षाच्या नियोजनात या दुरुस्ती व स्वच्छतागृहाच्या व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.