गंगापुरात शेतकऱ्यांचा संताप; कमी दरामुळे कांदा लिलाव बंद पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 02:48 PM2021-08-27T14:48:06+5:302021-08-27T14:52:01+5:30

कांदा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले 

Anger of farmers in Gangapur; The onion auction closed due to low rates | गंगापुरात शेतकऱ्यांचा संताप; कमी दरामुळे कांदा लिलाव बंद पाडला

गंगापुरात शेतकऱ्यांचा संताप; कमी दरामुळे कांदा लिलाव बंद पाडला

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी गंगापुर- वैजापूर मार्ग काही काळ बंद केला आहे

गंगापूर : येथील बाजार समितीच्या लिलावामध्ये कांदा ( Onion कमी दराने खरेदी केल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आक्रमक शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शेतकऱ्यांनी गंगापुर- वैजापूर मार्ग बंद केला. 

कांद्याला प्रती क्विंटल १६०० रुपये भाव देण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. तर व्यापाऱ्यांनी १३०० रुपये पेक्षा जास्त भाव देता येणार नसल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लीलाव बंद पडला. "शेतकरी एकजुटीचा विजय असो", "या व्यापाऱ्यांचा निषेध" शेतकऱ्यांच्या अशा घोषणांनी परिसर दणाणून केला. बाजर समिती आवारात वाढता गोंधळ लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. शेतकऱ्यांची पोलिसांमार्फत व्यापारी व बाजार समिती अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहे. 
 

Web Title: Anger of farmers in Gangapur; The onion auction closed due to low rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.