श्री सिद्धेश्वर यात्रेत पशु, अश्व प्रदर्शन
By Admin | Published: February 27, 2017 12:36 AM2017-02-27T00:36:11+5:302017-02-27T00:38:25+5:30
लातूर : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवारी पशु व अश्व प्रदर्शन यात्रेत होणार आहे.
लातूर : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून देवस्थान, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पशु व अश्व प्रदर्शन यात्रेत होणार आहे.
पशु प्रदर्शनामध्ये देवणी नर व मादी गट, लाल कंधारी नर व मादी गट, संकरीत वासरू गटातील पशूंना सहभागी करून घेतले जाणार आहे. वयोगट शून्य ते १ वर्षापर्यंतचा आणि एक वर्षांपुढील असणार आहे. अश्व गटात तेरा हाताखालील व तेरा हातावरील अश्व असावेत. कुक्कुट गटात देशी व विदेशी असे दोन गट सहभागी करून घेतले जाणार आहेत. शेळी गटात तीन पिले देणारी उस्मानाबादी शेळी असणाऱ्या पशुपालकांना या प्रदर्शनात सहभाग नोंदविता येईल. प्रत्येक गटांतील पशूंना प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत. या प्रदर्शनात जास्तीत जास्त पशुपालकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन देवस्थानचे मार्गदर्शक विक्रम गोजमगुंडे, मुख्य संयोजक ज्ञानोबा कलमे, संयोजक व्यंकटेश हालिंगे, देवस्थानचे सचिव अशोक भोसले, सुरेंद्र पाठक, कोषाध्यक्ष रमेश बिसेन, सुरेश गोजमगुंडे, बच्चेसाहेब देशमुख, ओम गोपे, लातूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, धनंजय बेंबडे, प्रदीप पाटील खंडापूरकर, उत्तम मोहिते, महादेवअप्पा अंकलकोटे, महादेव खंडागळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)