अंजना, पळशी प्रकल्पातून पहिले सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:05 AM2021-02-24T04:05:42+5:302021-02-24T04:05:42+5:30
अंजना पळशी मध्यम प्रकल्पाचा उजवा कालवा हा जवखेडा शिवारापर्यंत गेलेला आहे. सध्या पिंपरखेडा येथील शेतकऱ्यांनी रब्बीसाठी पाणी सोडण्याची मागणी ...
अंजना पळशी मध्यम प्रकल्पाचा उजवा कालवा हा जवखेडा शिवारापर्यंत गेलेला आहे. सध्या पिंपरखेडा येथील शेतकऱ्यांनी रब्बीसाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. सिंचन विभागाने यास मंजूरी दिल्याने सुमारे १०० हेक्टरपर्यंत क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पात सध्या ८९ टक्के इतका पाणी साठा असून मंगळवारी ३० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. किमान आठ दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. पुढील शेतकऱ्यांनी मागणी केल्यास पुन्हा पाणी सोडण्यात येईल, असे शाखा अभियंता विजय पाखले यांनी सांगितले. यावेळी कालवा निरीक्षक तुकाराम जाधव, पिंपरखेडाचे सरपंच अशोक लोखंडे, उपसरपंच सलीम शहा, पी.यू. घुगे, लक्ष्मण जाधव आदींसह लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
छायाचित्र : पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाहिले आवर्तन सोडण्यात आले. यावेळी शाखा अभियंता विजय पाखले, सरपंच लोखंडे, उपसरपंच शहा, तुकाराम जाधव व उपस्थित शेतकरी.
230221\patel mubeen abdul gafoor_img-20210223-wa0007_1.jpg
पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाहिले आवर्तन सोडण्यात आले. यावेळी शाखा अभियंता विजय पाखले, सरपंच लोखंडे, उपसरपंच शहा, तुकाराम जाधव व उपस्थित शेतकरी.