पिशोर येथील अंजना-पळशी धरण ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:05 AM2021-09-06T04:05:32+5:302021-09-06T04:05:32+5:30

नाचनवेल : पिशोर व नाचनवेल मंडळात झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील सर्वच लहानमोठे जलसाठे भरून ओसंडून वाहत आहेत. पिशोर ...

Anjana-Palashi dam overflow at Peshawar | पिशोर येथील अंजना-पळशी धरण ओव्हर फ्लो

पिशोर येथील अंजना-पळशी धरण ओव्हर फ्लो

googlenewsNext

नाचनवेल : पिशोर व नाचनवेल मंडळात झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील सर्वच लहानमोठे जलसाठे भरून ओसंडून वाहत आहेत. पिशोर येथील अंजना-पळशी धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर अंजना नदीची पाणीपातळी वाढत चालली आहे. यामुळे औरंगाबाद ते पिशोर व औरंगाबाद ते पाचोरा मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होणार आहे.

अंजना-पळशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. अद्यापही पावसाळ्याचा एक महिना बाकी असून, हवामान खात्याने येत्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. अंजना नदीवर नादरपूर व नाचनवेल असे दोन ठिकाणी पूल असून, दोन्हींची कामे अपूर्ण असल्याने नदीची पाणीपातळी वाढली तर पुलाच्या बाजूने काढलेले वळणरस्ते पाण्याखाली जाऊन या मार्गांवरील वाहतूक प्रभावित होणार असून, यामुळे वाहनधारकांना विनाकारण लांबचा फेरा मारावा लागणार आहे.

Web Title: Anjana-Palashi dam overflow at Peshawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.