अंकित भारत अ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 07:08 PM2019-01-20T19:08:49+5:302019-01-20T19:09:05+5:30

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याची २३ जानेवारीपासून इंग्लंड लॉन्सविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या ...

Ankit is the captain of the India A cricket team | अंकित भारत अ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी

अंकित भारत अ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी

googlenewsNext
ठळक मुद्देइंग्लंड लॉन्सविरुद्ध मालिका : चौथ्या, पाचव्या वनडेत भूषवणार नेतृत्व

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याची २३ जानेवारीपासून इंग्लंड लॉन्सविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. पहिल्या तीन सामन्यांत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असणारा अजिंक्य रहाणे भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. त्याचप्रमाणे ऋषभ पंत याची अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघात निवड झाली आहे.
बीसीसीआयच्या सिनिअर निवड समितीने इंग्लंड लॉयन्सविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी शनिवारी संघाची घोषणा केली.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सुरेख कामगिरी करणारा पंत याला दौºयावर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आले नव्हते; परंतु तो वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. महाराष्ट्र रणजी संघाचा कर्णधार अंकित बावणे हा २९ व ३१ जानेवारी रोजी होणाºया चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवील. या अखेरच्या दोन सामन्यांत ऋषभ पंत भारत अ संघाकडून खेळणार आहे. त्यानंतर ऋषभ ६ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाºया टी-२0 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करील.
इंग्लंड लॉयन्सविरुद्ध सुरुवातीच्या तीन सामन्यांत रहाणेच्या नेतृत्वाखाली निवडण्यात येणाºया संघात अंकित बावणे, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर यांनादेखील स्थान मिळाले आहे. पंत याच्याशिवाय कृणाल पांड्या यालादेखील न्यूझीलंडमध्ये होणाºया टी-२0 मालिकेआधी सरावाची संधी मिळेल. संघाची निवड देशांतर्गत सामन्यातील कामगिरीच्या आधारावर करण्यात आली आहे. त्यात रणजी करंडकात उपांत्य फेरीत पोहोचणाºया चारही संघांतील खेळाडूंना निवडण्यात आलेले नाही.
पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवली जाईल. त्यानंतर दोन चारदिवसीय सामन्यांची मालिकाही ७ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.
वनडे मालिकेसाठी भारत अ संघ
पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), अनमोलप्रीतसिंह, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, अंकित बावणे, इशान किशन (यष्टिरक्षक), कृणाल पांड्या, अक्षर पटेल, मयंक मार्कंडेय, जयंत यादव, सिद्धार्थ कौल, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर, नवदीप सैनी.
चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : अंकित बावणे (कर्णधार), अनमोलप्रीतसिंह, ऋतुराज गायकवाड, रिकी भुई, सिद्धेश लाड, हिंमतसिंह, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक हुड्डा, अक्षर पटेल, राहुल चाहर, जयंत यादव, नवदीप सैनी, आवेश खान, दीपक चाहर, शार्दूल ठाकूर.
दोनदिवसीय सराव सामन्यासाठी बोर्ड एकादश संघ : इशान किशन (कर्णधार), अक्षत रेड्डी, ध्रुव शोरे, रिकी भुई, सिद्धेश लाड, रिंकू सिंह, प्रियम गर्ग, सौरभ कुमार, राहुल चाहर, जयंत यादव, अनिकेत चौधरी, अंकित राजपूत, राजेश मोहंती.

Web Title: Ankit is the captain of the India A cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.