ऐन दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादेत घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:34 PM2018-10-30T22:34:43+5:302018-10-30T22:35:15+5:30

दिवाळसणाच्या तोंडावर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्यापासून शहरात घरफोडीच्या घटना सलग सुरूच आहेत. खिडकी गँग अजूनही सक्रिय असावी असे मंगळवारी पहाटे झालेल्या चोरीच्या तीन घटनांवरून समोर आले.

Anne burst into Aurangabad in the mouth of Diwali | ऐन दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादेत घरफोड्या

ऐन दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादेत घरफोड्या

googlenewsNext
ठळक मुद्दे खिडकी गँग सक्रिय? : पोलीस यंत्रणा मागावर


औरंगाबाद : दिवाळसणाच्या तोंडावर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्यापासून शहरात घरफोडीच्या घटना सलग सुरूच आहेत. खिडकी गँग अजूनही सक्रिय असावी असे मंगळवारी पहाटे झालेल्या चोरीच्या तीन घटनांवरून समोर आले. बँक अधिकाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी नऊ तोळे सोने, चांदी आणि साडेतीन हजार रुपये लांबविले. तिसºया मजल्यावरील खिडकीच्या ग्रील तोडून चोरटे पैठणगेट, टिळकपथवरील दोन कपड्याच्या दुकानांत घुसले. या तिन्ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडल्या.
सिडकोतील वीर सावरकरनगरात राहणारे श्रीनिवास अशोक पवार हे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या झोनल कार्यालयात सहायक व्यवस्थापक आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टीहून त्यांची शहरात मे महिन्यात बदली झाली. बँकेने दिलेल्या वीर सावरकरनगरातील चार खोल्यांच्या घरात ते राहत होते. बँकेच्या कार्यशाळेनिमित्त ते चार दिवसांसाठी हैदराबादला गेले आहेत. त्यांच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने त्यांची आई व बहीण सोमवारी जालन्याहून आल्या होत्या. रात्री दोन वाजेपर्यंत तिघींनी गप्पा मारल्या. चार खोल्यांच्या घरातील एका खोलीमधील कपाटात दागिने आदी किमती वस्तू ठेवल्या होत्या. त्या रूमला आतून बंद करून तिघीही दुसºया खोलीत झोपल्या. मध्यरात्री चोराने नेमके दागिने आणि रोकड असलेल्या खिडकीची बाहेरून ग्रील उचकटली. त्यातून घुसून चोरट्यांनी कपाटातील चाव्या घेतल्या. कपाटातील नऊ तोळ्यांचे दागिने, चांदी आणि साडेतीन हजारांची रोकड लांबवली. विशेष म्हणजे कपाटातील बेन्टेक्सच्या दागिन्यांना चोरट्यांनी हातही लावला नाही. चोरीचा प्रकार पवार कुटुंबियांच्या सकाळी लक्षात आला. त्यांनी सिडको पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक, ठसेतज्ज्ञ, श्वान पथक, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, फौजदार विजय पवार यांनी धाव घेतली.
चोरांचा माग काढण्यास श्वान अपयशी
श्वान पथकातील संजय महेर, सचिन हरणे, पोपट आळंजकर यांनी श्वान हिराच्या मदतीने चोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे वाहनाने आल्यामुळे श्वान हिराला त्यांचा माग काढणे अशक्य झाले.

रेकी केल्याचा अंदाज
वीर सावरकरनगरचा परिसर अतिशय शांत आहे. पवार यांच्या घराजवळच एक जीम आहे. दिवसादेखील या परिसरात शांतता असते. चोरांनी दिवसा या भागाची पाहणी केल्यानंतर मध्यरात्री चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपड्यांची दुकाने फोडली
अतिशय गजबजलेल्या पैठणगेट, टिळकपथवरील दोन दुकाने फोडून चोरांनी २७ हजार ५०० रुपयांची रोकड लांबवली. हा प्रकार मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निदर्शनास आला. विनोद लक्ष्मणदास चोटलानी (५२, रा. प्लॉट क्र. १७३, सिंधी कॉलनी) यांचे टिळकपथवर राजधानी हॅण्डलूम हे दुकान आहे. त्यांच्या शेजारी महेश बिहारीलाल नाथानी (रा. विष्णूनगर) यांचे किंग्स अ‍ॅण्ड किडस् दुकान आहे. या दोघांच्या दुकानाच्या छतावरून चोरटे जिन्याने पहिल्या मजल्यावर आल्याचा कयास आहे. गल्ल्याचे ड्रॉवर उचकटून एका दुकानातून २५ हजारांची रोख, तर दुसºया दुकानातील अडीच हजार लांबवले. हा प्रकार सकाळी दुकानात प्रवेश करताच दोघांच्या निदर्शनास आला. त्यावरून त्यांनी तात्काळ क्रांतीचौक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार शेख एजाज तपास करीत आहेत.

Web Title: Anne burst into Aurangabad in the mouth of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.