पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्या अखेर जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:22 PM2019-02-19T23:22:33+5:302019-02-19T23:23:12+5:30
पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्या अखेर शिवजयंतीच्या मुहूर्तावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जाहीर केल्या. सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, गोवर्धन कोळेकर, हनुमंतराव भापकर यांच्यासह १४ निरीक्षक आणि १६ सहायक निरीक्षकांंचा बदलीत समावेश आहे.
औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्या अखेर शिवजयंतीच्या मुहूर्तावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जाहीर केल्या. सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, गोवर्धन कोळेकर, हनुमंतराव भापकर यांच्यासह १४ निरीक्षक आणि १६ सहायक निरीक्षकांंचा बदलीत समावेश आहे.
छावणी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे यांची बदली वाहतूक विभागात करण्यात आली असून, त्यांच्या जागी वाहतूक शाखेचे हनुमंतराव भापकर यांना शहर विभागासह छावणीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. गोवर्धन कोळेकर यांना शहर विभागातून विशेष शाखेत पाठविले आहे.
पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड क्रांतीचौकातून एमआयडीसी वाळूजला, तर अनिल आडे यांना वेदांतनगरहून सातारा ठाण्यात पाठविले आहे. सातारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे (नियंत्रण कक्ष),वाळूज वाहतूक शाखेचे मनोज पगारे (छावणी ठाणे), नियंत्रण कक्षातील उत्तम मुळक (क्रांतीचौक पोलीस ठाणे), छावणी वाहतूक शाखेचे मुकुंद देशमुख (हर्सूल पोलीस ठाणे), नियंत्रण कक्षातील अशोक गिरी (मुकुंदवाडी पोलीस ठाणे), सिडको वाहतूक शाखेचे हनुमंत गिरमे (जवाहरनगर पोलीस ठाणे), सायबर सेलचे संदीप गुरमे (वाळूज पोलीस ठाणे), विभागातील रामेश्वर रोडगे यांना वेदांतनगर पोलीस ठाणे मिळाले आहे. वाळूज ठाण्याचे सतीश टाक बीडीडीएस आणि सिडको ठाण्याच्या निर्मला परदेशी यांची बदली सिडको वाहतूक शाखेला झाली आहे. मुकुंदवाडी ठाण्याचे नाथा जाधव वाळूज वाहतूक शाखेला गेले आहेत. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे शरद इंगळे यांना छावणी वाहतूक शाखेत पाठविले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अशोक आव्हाड बेगमपुरा ठाण्यातून सुरक्षा विभागात, साहेबराव कांबळे जवाहरनगरातून नियंत्रण कक्षात, तर एमआयडीसी सिडकोचे राहुल जाधव यांची बदली नियंत्रण कक्षात झाली आहे. एमआयडीसी वाळूजचे विजय घेरडे उस्मानपुरा, तर साईनाथ गिते जिन्सी ठाण्यातून वेदांतनगरात गेले आहेत. आशा भांगे यांची बदली सिटीचौकहून एमआयडीसी वाळूज ठाण्यात झाली. वेदांतनगर ठाण्यातील वनिता चौधरी यांची बदली जिन्सी ठाण्यात करण्यात आली आहे. मनोज बहुरे यांची बदली सातारा ठाण्यातून वाहतूक शाखेला केली आहे. उर्वरित बदल्या अशा (कंसात सध्याचे ठिकाण)
वामन बेले (उस्मानपुरा पोलीस ठाणे)-नियंत्रण कक्षात,
सिकंदर खान समशेर खान (सिटीचौक पोलीस ठाणे) - पैरवी अधिकारी,
सतीश जाधव (क्रांतीचौक ठाणे) - वाहतूक शाखा,
शांतीलाल राठोड (शहर वाहतूक शाखा)- क्रांतीचौक ठाणे,
शेख अखमल (शहर वाहतूक शाखा)- एमआयडीसी सिडको,
शेषराव खटाणे (छावणी वाहतूक शाखा)- सिटीचौक पोलीस ठाणे,
राहुल सूर्यतळ (गुन्हेशाखा)- क्रांतीचौक पोलीस ठाणे,
- घनश्याम सोनवणे (पीआरओ) - पुंडलिकनगर पोलीस ठाणे.
पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे व ठाण्यातून कार्यमुक्त केल्याचा दिनांक कार्यालयास कळवावा, असेही पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांंनी आदेशित केले आहे.