उपमहापौरपदाच्या उमेदवाराची घोषणा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:52 AM2017-10-24T00:52:32+5:302017-10-24T00:52:32+5:30
उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. सोमवारी महापौर बंगल्यावर भाजप कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठकीत नावावर एकमत झाले नाही. उद्या प्रदेश कार्यकारिणीकडून नाव घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक २९ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. सेनेने २५ दिवस आधीच उमेदवारी घोषित करून वेगळीच राजकीय खेळी केली. उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. सोमवारी महापौर बंगल्यावर भाजप कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठकीत नावावर एकमत झाले नाही. उद्या प्रदेश कार्यकारिणीकडून नाव घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रविवार, २९ आॅक्टोबर रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. सेनेतर्फे नंदकुमार घोडेले यांना महापौरपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने उपमहापौरपदासाठी अद्याप नाव जाहीर केलेले नाही. ज्येष्ठ नगरसेवक राजू शिंदे, नितीन चित्ते, राजगौरव वानखेडे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत उपमहापौर कोणाला करावे, या मुद्यावर वेगवेगळे मतप्रवाह समोर आले. कोअर कमिटीमध्येच दोन गट पडल्याने कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही.