औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:46 AM2017-12-28T00:46:19+5:302017-12-28T00:46:53+5:30
औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी बुधवारी जाहीर झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी पंकज भारसाखळे, सचिव म्हणून गोविंद शर्मा आणि कार्याध्यक्ष म्हणून बिजली देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी बुधवारी जाहीर झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी पंकज भारसाखळे, सचिव म्हणून गोविंद शर्मा आणि कार्याध्यक्ष म्हणून बिजली देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे मावळते अध्यक्ष कमांडर विनोद नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. ही कार्यकारिणी दोन वर्षांसाठी असणार आहे.
प्रतिभवान खेळाडूंच्या गुणांचा गौरव करणे, त्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे आणि स्पर्धा आयोजित करणे हा आॅलिम्पिक संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे विद्यमान अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची नूतन कार्यकारिणी-
संस्थापक अध्यक्ष : सचिन मुळे, अध्यक्ष : पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष : बिजली देशमुख, सचिव : गोविंद शर्मा. उपाध्यक्ष : सौरभ भोगले, विनोद नरवडे, उदय डोंगरे, फुलचंद सलामपुरे, अब्दुल कदीर. सहसचिव : दिनेश वंजारे, नीरज बोरसे, संदीप जगताप, अभय देशमुख. कोषाध्यक्ष : विश्वास जोशी.
कार्यकारिणी सदस्य : अजित मुळे, मकरंद जोशी, कुलजितसिंग दरोगा, सिद्धार्थ पाटील, दयानंद कांबळे, हेमेंद्र पटेल, विशाल देशपांडे, अतुल बामनोदकर, मनजितसिंग दरोगा, लता कलवार, हेमंत मोरे, सुरेश मिरकर, भिकन आंबे, अमृत बिºहाडे, प्रसाद कुलकर्णी, राकेश खैरनार, ज्ञानदेव मुळे, गणेश कड, अरुण भोसले, लक्ष्मीकांत खिची, शरद कचरे, रणजित भारद्वाज, चरणजितसिंग संघा, सचिन देशमुख, राम जाधव.