राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर

By Admin | Published: March 17, 2016 12:26 AM2016-03-17T00:26:28+5:302016-03-17T00:27:11+5:30

औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

Announcing the results of the National Intelligence Exam | राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर

googlenewsNext

औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावरची ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यात दिली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आता ८ मे रोजी होणार आहे. राज्यस्तरावरील या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत (लेवल- १) जवळपास २९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून ज्ञानदीप फाऊंडेशन सेंटरने निकालाची परंपरा कायम राखली आहे.
‘एनटीएसई’कडे ‘आयआयटी’, ‘जेईई’, ‘एआयएमटी’, ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’, ‘एमबीए- कॅट’ आदी स्पर्धा पूर्वपरीक्षेची लहान आवृत्ती म्हणून बघितले जाते. एनटीएसईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात मेडिकल, इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा फारशी अवघड जात नाही.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओम सूर्यवंशी, ओंकार सबनीस, साक्षी चव्हाण, मानसी पाटील, गार्गी बचके, चैतन्य गुंटूरकर, ऐश्वर्या कुलकर्णी, प्रतीक अग्रवाल, पार्थ तवारवाला, प्रांजल देसले, रम्यता पाटे, हर्षद सपकाळ, समीर शेख, अंकिता देशमुख, अभिषेक रोडगे, सुनंदा सोमवसे, मंजुरी जोशी, ऋषी गाडेकर, ऋतुजा येवले, साक्षी डोंबरे, वेदिका गोरे, श्लोका पाटील, सुमेधा कुलकर्णी, विक्रांत पावसे, साहिल कोडगायले, प्रणय शित्रे, रेणुका तालिमकर, अविका इंगळे व स्वानंद मामिलवाड आदींचा समावेश आहे. ‘डीएफसी’च्या संचालिका शीतल काबरा, गोविंद काबरा, प्रदीप सोमाणी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली आहे.

Web Title: Announcing the results of the National Intelligence Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.