संतापजनक ! 'रिक्षात सिगारेट पेटवू नको', म्हणणाऱ्या दाम्पत्याला चालकासह दोघांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 05:11 PM2021-11-22T17:11:23+5:302021-11-22T17:11:49+5:30

रिक्षा थांबताच नागरिकांनी आणि महिलेच्या पतीने तरुणांची चांगलीच धुलाई केली

Annoying! 'Don't light a cigarette in the rickshaw', the couple was beaten by the driver | संतापजनक ! 'रिक्षात सिगारेट पेटवू नको', म्हणणाऱ्या दाम्पत्याला चालकासह दोघांची मारहाण

संतापजनक ! 'रिक्षात सिगारेट पेटवू नको', म्हणणाऱ्या दाम्पत्याला चालकासह दोघांची मारहाण

googlenewsNext

औरंगाबाद : रिक्षातून प्रवास करताना सिगारेट पेटवू नको, असे सांगितल्याने रिक्षाचालक व त्याच्या भावांनी प्रवासी दाम्पत्याला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर घडली.

हर्सूल ते वसंतराव नाईक चौक (सिडको चौक) रस्त्यावर शनिवारी सायंकाळी रिक्षातून सिडको चौकाकडे जाण्यासाठी एक दाम्पत्य रिक्षाचालक विकी जयवंत गायकवाड (वय २१, रा. फातेमानगर, हर्सूल) याच्या रिक्षात बसले. या रिक्षात आधीच अजय जयवंत गायकवाड (वय १९) आणि दिनकर गायकवाड हे रिक्षाचालकाचे दोन भाऊ बसलेले होते. रिक्षा काही अंतरावर जाताच दिनकरने सिगारेट पेटविली, त्यामुळे सदर महिलेने सिगारेट पिऊ नका, धुराचा त्रास होतो असे सांगितले. 

त्यामुळे वाद होऊन रिक्षाचालक व त्याच्या दोन भावांनी दाम्पत्याला मारहाण केली. अजयने महिलेच्या पतीला दगडाने मारून जखमी केले. भोला चौकात रिक्षा थांबल्यानंतर नागरिक गोळा झाले. त्यानंतर नागरिकांनी आणि महिलेच्या पतीने तरुणांची चांगलीच धुलाई करीत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: Annoying! 'Don't light a cigarette in the rickshaw', the couple was beaten by the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.