लोकविकास बँकेची वार्षिक सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:04 AM2021-03-19T04:04:22+5:302021-03-19T04:04:22+5:30

औरंगाबाद : लोकविकास नागरी सहकारी बँकेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा १३ मार्चला उत्साहात पार पडली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी बँकेचे ...

The annual meeting of Lok Vikas Bank is in full swing | लोकविकास बँकेची वार्षिक सभा उत्साहात

लोकविकास बँकेची वार्षिक सभा उत्साहात

googlenewsNext

औरंगाबाद : लोकविकास नागरी सहकारी बँकेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा १३ मार्चला उत्साहात पार पडली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष एकनाथ जाधव होते. बँकिंग क्षेत्रात येणाऱ्या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा खातेदारांना दिला जात आहे. बँकेत कोणतीही अनियमितता होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. बँकेचे भागभांडवल ५०६.०७ लाख रुपये, निधी ११०६.६१ लाख रुपये, ठेवी १३६३०.९७ लाख रुपये, कर्ज वाटप ८१०२.२३ लाख, गुंतवणूक ६१५०.८५ लाख, नफा ८५.९४ लाख, खेळते भांडवल १५५१५.१० लाख रुपये असल्याचे जाहीर करण्यात आले. मागील वर्षीचे अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय औटी यांनी, तर सूत्रसंचालन भाग्यश्री गाडेकर यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष रामदास फड, संचालक जे. के. जाधव, मुरलीधर जगताप, माधव जेऊघाले, पोपटराव जाधव, ललित माळी, कचरदास राऊत, भावराव गायकवाड, विक्रांत जाधव, अनुराधा दानवे यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.

कॅप्शन

लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लक्ष्मीपूजन करताना संचालिका अनुराधा दानवे, शेजारी एकनाथ जाधव व अन्य संचालक.

Web Title: The annual meeting of Lok Vikas Bank is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.