वार्षिक मूल्यदर तक्ते ; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:06 AM2021-02-11T04:06:01+5:302021-02-11T04:06:01+5:30
महिलांकरिता मोफत योग शिबिराचे आयोजन औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल येथे ११ ते १६ ...
महिलांकरिता मोफत योग शिबिराचे आयोजन
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल येथे ११ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ७ ते ९ वा. या वेळेत महिलांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन केले आहे. विभागीय उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे हे शिबीर घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वांचे एकाच दिवशी लसीकरण
औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी कोरोना लसीकरण शिबीर होणार असून त्याबाबत नियोजन सुरू आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी लसीकरण शिबिरात भाग घेतील. जिल्हाधिकारी यांनी सांगितले, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी लसीकरण करण्याचे नियोजन सुरू आहे. सर्वांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल. प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांसमोर हा विचार मांडण्यात येणार आहे.