सासऱ्याचा परस्पर प्लॉट विकणाऱ्या जावयावर दुसरा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:05 AM2021-07-30T04:05:16+5:302021-07-30T04:05:16+5:30
विष्णू नगर येथील व्यापारी विजय अग्रवाल यांनी चार दिवसांपूर्वी जावई नीलेश प्रेमकुमार अग्रवाल याने बनावट सह्या करून आकाशवाणी ...
विष्णू नगर येथील व्यापारी विजय अग्रवाल यांनी चार दिवसांपूर्वी जावई नीलेश प्रेमकुमार अग्रवाल याने बनावट सह्या करून आकाशवाणी परिसरातील प्लॉट विकल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून जावयाच्या विरेाधात गुन्हा दाखल झाला होता. जागेचे मूळ मालक विजय अग्रवाल यांनी ही जागा व्यंकट पिराजी मालेगावे यांना तीन वर्षांच्या भाडेकरारावर गॅरेज चालविण्यासाठी दिली होती. जावयाने प्लाॅट परस्पर विक्री केल्यानंतर संबंधितांनी गॅरेजवर येऊन मालेगावे यांना प्लॉट खाली करण्यासाठी धमकी दिली. त्यात जावयासह विजय पडवळ, सुशील भिसे यांच्यासह एक महिला होती. या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे अधिक तपास करीत आहेत.
चौकट,
आरोपींना नोटीस पाठविल्या
प्लॉटचे मूळ मालक विजय अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यांनी आरोपीस चौकशीसाठी नाेटीस पाठविली आहे. फसवणुकीचा प्रकार असल्यामुळे थेट अटक करता येत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.