विद्यापीठात प्रवेश घेण्याची आणखी एक संधी; १९ सप्टेंबरला पुन्हा स्पाॅट ॲडमिशन फेरी

By योगेश पायघन | Published: September 13, 2022 01:21 PM2022-09-13T13:21:13+5:302022-09-13T13:22:40+5:30

पदव्युत्तर पदवीच्या ६० अभ्यासक्रमांच्या ८२९ जागा रिक्त राहिल्या आहेत.

Another chance to get admission into Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University; Spot admission round again on 19th September | विद्यापीठात प्रवेश घेण्याची आणखी एक संधी; १९ सप्टेंबरला पुन्हा स्पाॅट ॲडमिशन फेरी

विद्यापीठात प्रवेश घेण्याची आणखी एक संधी; १९ सप्टेंबरला पुन्हा स्पाॅट ॲडमिशन फेरी

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या ६० अभ्यासक्रमांच्या ८२९ जागा रिक्त राहिल्या आहेत. एमएसस्सी आयटी, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट, एमए अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, एमएसडब्ल्यू या विभागांच्या जागा पूर्ण भरल्या गेल्या. रिक्त जागा भरण्यासाठी १९ सप्टेंबरला पुन्हा स्पॉट ॲडमिशनची संधी दिली जाणार आहे.

विद्यापीठातील विभागांसह उस्मानाबाद उपपरिसरातील २५८२ जागांसाठी विद्यापीठात प्रवेशोत्सव पार पडला. त्यानंतर स्पाॅट ॲडमिशन प्रवेश फेरी पार पडली. प्रवेशोत्सवात ६७ अभ्यासक्रमांच्या ५३ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. १० सप्टेंबरला स्पॉट ॲडमिशन फेरीनंतर ८२९ (३१.६४ टक्के) जागा रिक्त आहेत. तर १७६५ (६७.३५टक्के) प्रवेश झाले. 

या विभागात जागा रिक्त आहेत 
पर्यटनशास्त्र १०, इंग्रजी ३३, हिंदी १६, मराठी २०, वृत्तपत्रविद्या ९, लोकप्रशासन १४, फुले आंबेडकर विचारधारा ३२, संगीत ३३, एम.काॅम २०, पीजी डिप्लोमा इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीला २०, पीजी डिप्लोमा इन फूड सेफ्टी अँड क्वालिटीला १८, लाइफ लाँग लर्निंगच्या २१, गणित ३४, नॅनो टेक्नॉलाॅजी १२, प्राणिशास्त्र १५, एलएलएम ६५. जैवविविधता संवर्धन २७ जागा रिक्त आहेत.

Web Title: Another chance to get admission into Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University; Spot admission round again on 19th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.